भारत देश हा अनेक संत, महापुरुषांनी बनलेला देश आहे. ज्यांचे विचार आपल्याला कित्येक पिढ्या प्रेरणा देत आले आहेत. या महापुरुषांच्या विचारांमुळे आपल्याला एक सकारात्मक संदेश मिळत असतो. संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य खचून जातो, निराश होतो. तेव्हा आपण महापुरुषांचे विचार वाचतो आणि त्यामुळे पु्हा एकदा लढण्याचे बळ मिळते. आज स्वामी विवेकानंद यांची १६० वी जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांना अतिशय कमी आयुष्य लाभले. तरिही आपल्या ज्ञानाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी खूप मौल्यवान विचार युवा पिढीला दिले आहेत. जे तरुणांचे जीवन उजळून काढण्याची क्षमता ठेवतात. तर आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त निवडक दहा विचार वाचणार आहोत. ज्याने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वामी विवेकानंद यांचा जीवनाची थोडक्यात ओळख

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ साली कोलकाता येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना स्वामी विवेकानंद हे नाव दिले. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म संमेलनात त्यांनी भारतातर्फे केले भाषण गाजले होते. या भाषणात त्यांनी भारतीय सनातन धर्म आणि त्याचे व्याप्ती जगाला समजावून सांगितली होती.

स्वामी विवेकानंद यांचे १० तेजस्वी विचार

१) उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका.

२) स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात. स्वतःला कमजोर समजने हे सर्वात मोठे पाप आहे.

३) स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

४) आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायूंची व पोलादी मज्जातंतूंची आवश्यकता आहे. आपण पुष्कळ दिवस रडलो. आता रडणे पुरे, आता आपल्या पायावर उभे राहा व मनुष्य बना.

५) स्वतः समोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे असा माणूस जर हजार चुका करीत असेल तर काहीच ध्येयं नसलेला माणूस पन्नास हजार चुका करीत असणार याची मला खात्री आहे. आहे म्हणून स्वतः समोर कोणते ना कोणते ध्येय ठेवूणे केव्हाही अधिक चांगले.

६) मनुष्य प्रकृतीवर मात करण्यासाठी जन्माला आलेला आहे. प्रकृतीचा गुलाम होऊन राहण्यासाठी नव्हे.

७) तुमचा विकास आतून झाला पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही . तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही.

८) जगात पापही नाही आणि पुण्यही नाही जगात केवळ अज्ञान आहे. अध्यात्माच्या अनुभवाने या ज्ञानाचा निरास होतो.

९) डोक्यावर जणू दुःखाचा मुकूट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते. जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचेही स्वागत केले पाहिजे.

१०) तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर नेत्तृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami vivekanand 10 inspiring quotes you need to know on his birth anniversary kvg