कच-याची विल्हेवाट कशी लावायची? ही अनेक देशांची सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. शहरे वाढत आहेत, डंम्पिग ग्राऊंडसाठी जागा कमी पडत चालली आहे. हा कचरा जाळूनही टाकणे योग्य नाही कारण यामुळे प्रदूषणात आणखी भर पडते. तेव्हा वेगवेगळ्या उपाययोजना वापरून कच-याची विल्हेवाट लावली जात आहे. कचरा साठून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. दरदिवशी लाखो टन कच-याची निर्मिती होते. पण, एक देश असाही आहे ज्याकडे कच-याचा तुटवडा निर्माण झाला असून, हा तुटवडा भरुन काढण्यासाठी इतर देशांतून कचरा आयात करण्याची वेळ या देशावर आली आहे.

वाचा : भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

स्वीडन या देशाला मोठ्या प्रमाणत कच-याचा तुटवडा जाणू लागला आहे. खरे पाहता आपल्या देशात कचरा तयार होत नाही हे त्या देशासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण स्वीडनसाठी मात्र ती आता चिंतेची बाब बनत चालली आहे. त्यामुळे आता चक्क कचरा इतर देशांतून आयात करण्याची वेळ या देशावर आली आहे. याचे कारणही तसेच आहे. हा देश कच-याचा पुनर्वापर करून त्यापासून उर्जानिर्मिती करतो. ही उर्जा थंडीत घरे उबदार ठेवण्यासाठी वापरली जातात. हा देश आपल्या गरजेच्या अर्ध्याधिक विजेची निर्मिती ही टाकाऊ पदार्थांचा वापर करून करतो. तसेच हा असा देश आहे ज्याने १९९१ पासूनच जिवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावायला सुरुवात केली. विशेष म्हणजे जिवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावणा-या काही मोजक्या देशांपैकी स्वीडन एक आहे.

कच-याच्या पुनर्वापरावर या देशाने इतक्या मोठा भर दिला आहे की या देशात जितका कचरा तयार होतो त्यापैकी फक्त १ टक्का कचराच जमीनीत पुरला जातो. बाकी कच-याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे अधिक उर्जानिर्मितीसाठी हा देश कचरा आयात करत आहे. तसेच भविष्यात कचरा वाहून नेण्यासाठी जमिनीखालून भूमितग कन्टेनर प्रणाली तयार करण्याचा विचार स्वीडनचा आहे.

Story img Loader