ज्या ठिकाणी पार्किंगची जागा नसते त्याठिकाणीसुद्धा बिंधास्त वाहाने पार्क केलेली आपण पाहिली असतील. कधी कधी या वाहानांवर कारवाई करत टोविंग व्हॅनच्या सहाय्याने उचलण्यात येतात. पण, यापलिकडेही चुकीच्या ठिकाणी वाहान पार्क करणा-या गाडीमालकास अद्दल घडवण्यासाठी एका चीनी सफाई कर्मचा-याने एक अनोखी युक्ती शोधली. रस्त्याच्या कडेला चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करणा-या या गाडीच्या भोवती सफाई कर्मचा-याने चक्क कच-याचे डब्बे ठेवले. याचा ११ सेकंदाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

वाचा : फक्त एक १ रुपयात साडी; नियम आणि अटी लागू

चीनच्या सीसीटीव्ही न्यूजने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. एका कारचालकाने आपली गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केली होती. तेव्हा या कार चालकाला अद्दल घडवण्यासाठी सफाई कर्मचा-याने कच-याने भरलेले मोठे डब्बे त्याच्या गाडीच्या चहूबाजूला ठेवले. या सफाई कर्मचा-याने एक दोन नाही तर चक्क ४० हून अधिक कच-याचे डब्बे या गाडीभोवती रचून ठेवले. हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. त्यामुळे चालकाला गाडी चालवायची असेल तर मात्र त्याला हे कच-याचे डब्बे बाजूला करण्यावाचून कोणताही पर्याय उरणार नाही. आतापर्यंत फेसबुक, ट्विवटर आणि युट्युबवर सारख्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या सफाई कर्मचा-याने  चालकाला जीवनभराची अद्दल घडवली असणार हे नक्की.

चीनची लोकसंख्या अधिक आहे. येथे वाहानांची संख्याही तितकीच जास्त आहे. त्यामुळे शाळा, इमारती, रुग्णालय जिथे जागा मिळेल तिथे लोक गाड्या पार्क करत आहेत. ही मोठी समस्या बनली आहे. तेव्हा अशाच बेजबाबदार चालकास अद्दल घडवण्यासाठी सफाई कर्मचा-याने ही अजब युक्ती शोधून काढली आहे. गेल्यावर्षी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अपंगासाठी आरक्षित असलेल्या पार्किंग लॉटमध्ये एकाने आपली गाडी पार्क केली होती. तेव्हा काही लोकांनी मिळून त्याच्या पूर्ण गाडीवर स्टिकी नोट्स लावल्या होत्या. गाडीचे दरवाजे, काचा, चाकांपासून सगळीकडे स्टिकी नोट्स लावून ठेवल्या होत्या.

वाचा : माजी कर्मचा-यांनी सांगितले ‘गुगल’ कंपनीतले वाईट अनुभव

Story img Loader