Sweets Shop Disgusting Video : गरमागरम समोसा म्हटलं की अनेकांना तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे तुम्हाला अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये वडापावबरोबर समोसाही विक्रीसाठी ठेवलेले दिसतात.तिखट-गोड चटणीबरोबर गरमागरम समोसा खाऊन पोट भरते. जर तुम्हीही अशाप्रकारे कोणत्या मिठाईच्या दुकानातून किंवा रस्त्याकडील विक्रेत्याकडे गरमागरम समोसे खात असाल तर व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच. कारण हा व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडचं पाणी पळेलच, शिवाय पुन्हा समोसा खाताना तुम्ही १०० वेळा विचार कराल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये अतिशय गलिच्छ पद्धतीने समोसे, वडे बनवून ग्राहकांना विकले जातात. भुकेच्या नादात लोकही हे पदार्थ कशाप्रकारे बनवले जातायत, बनवताना स्वच्छतेबाबत नीट काळजी घेतली की नाही याकडे लक्ष देत नाहीत. पण, तुम्ही कधी मिठाईच्या दुकानाबाहेर समोसे बनवण्याची पूर्ण प्रोसेस निरखून पाहिली तर तुमच्या लक्षात आले असेल की, अनेकदा समोस्याच्या सारणावर झाकण नसते, उघड्यावर हे समोसे बनवून तळले जातात. तसेच यासाठी वापरलेली भांडी अनेक दिवस नीट घासलेलीदेखील नसतात. त्यात आता एका मिठाईच्या दुकानातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक कामगार समोसे बनवण्यासाठी वापरले जाणारे बटाटे पायात चप्पल घालून धुताना दिसत आहे. हा व्हिडीओ गाझियाबादच्या कुमार स्वीट्स कॉर्नरमधील असल्याचे सांगितले जात आहे.

Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

व्हिडीओ पाहून कोणालाही बाहेरचे खाण्याची होणार नाही इच्छा

यावेळी स्वीट्स कॉर्नरजवळच्या एका छतावरून कोणीतरी गुपचूप या कामगाराचा व्हिडीओ शूट केला, जो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ इतका किळसवाणा आहे की, तो पाहून कोणालाही बाहेरचे खाण्याची इच्छा होणार नाही.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मिठाईच्या दुकानामागे एक कामगार एका पातेल्यात उभं राहून पायात चप्पल घालून बटाटे तुडवून ते धुताना दिसतोय. अतिशय गलिच्छ प्रकारे बटाटे धुण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अनेकांनी बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.

मिठाईच्या दुकानातील अतिशय किळसवाणे कृत्य

Read More Video : “बाईSS… काय हा प्रकार”; भरट्रॅफिकमध्ये तरुणीनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी चक्रावले; VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात

पण, ही पहिलीच घटना नाही. याच महिन्यात गाझियाबादमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती, ज्यात एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या समोशामध्ये एका ग्राहकाला चक्क बेडकाचा पाय सापडला होता. यावेळी समोसे खरेदी करणाऱ्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून दुकानात गोंधळ घातला होता.

Story img Loader