Swiggy Delivery Boy Emotional Story: आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देणारे रिअल हिरो अनेकदा व्हायरल होत आहेत. त्यांच्या कहाण्या ऐकून जितका प्रेरित व्हायला होतं तितकंच कुठेतरी त्यांच्या अडचणींविषयी वाईट सुद्धा वाटतं. अनेक जण स्क्रोल करताच प्रेरणा व दुःख दोन्ही भावना विसरतात पण काहीजण माणुसकी दाखवून या लोकांचे आयुष्य बदलण्यात हातभार लावतात. अलीकडे फूड डिलिव्हरीसाठी आलेल्या एका व्यक्तीचे आयुष्य अशाच एक सुंदर मनाच्या मुलीने पूर्णपणे बदलले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांशी चंदेल, टेक कंपनी फ्लॅशच्या मार्केटिंग मॅनेजर, यांनी LinkedIn वर स्विगी डिलिव्हरी बॉयची एक कहाणी शेअर केली आहे. हा डिलिव्हरी एजंट, साहिल सिंग, आईस्क्रीम ऑर्डर देण्यासाठी चंदेल यांच्या घरी पोहोचला. डिलिव्हरीच्या वेळेपेक्षा त्याला ३०-४० मिनिटे उशीर झाला. उशीर झाल्यावर चंदेलने साहिलला त्यामागचे कारण विचारले.

साहिलने फूड पार्सल हातात देताच सांगितले की, तो फूड डिलिव्हरी करण्यासाठी ३ किलोमीटर चालत आला होता कारण त्याच्याकडे ना पैसे होते ना वाहान. साहिलने सांगितले की तो स्वतः एक इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन इंजिनीअर आहे आणि यापूर्वी बायजू आणि निंजाकार्ट सारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. मात्र, कोविड काळात नोकरी गमावल्याने त्याला जम्मूला त्याच्या मूळगावी परतावे लागले.

साहिल पुढे म्हणाला की, त्याच्या फ्लॅटमेटने त्याच्याकडील एकूण एक रुपया लुटला आणि अक्षरशः त्याचा बँक बॅलन्स मायनसमध्ये आणला होता. आता त्याच्याकडे घरमालकाला भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते. आठवडाभर उपाशी राहून त्याने चहा व पाण्यावर दिवस काढले, पात्रता व अनुभव असूनही पैसे नसल्याने त्याला अत्यंत वाईट दिवस पाहावे लागले.

साहिलच्या कहाणीने प्रभावित होऊन चंदेलने त्याला मदत करण्याची जबाबदारी घेतली. तिने लिंक्डइनवर त्याची कहाणी शेअर केली आणि वापरकर्त्यांना त्याला नोकरी शोधण्यात मदत करण्याची विनंती केली. तिने त्याचा ईमेल आयडी, मार्कशीट , प्रमाणपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे सुद्धा पोस्टमध्ये शेअर केली. ऑफिस बॉय, प्रशासकीय काम, ग्राहक समर्थन किंवा इतर कोणत्याही पदांवर काम शोधण्यासाठी चंदेलनी आवाहन केले होते ज्याला अनेकांनी उदंड प्रतिसाद दिला.

सध्याच्या अपडेटनुसार, साहिलला एक उत्तम नोकरी मिळाली आहे. अशा कहाण्यांमधून खऱ्या अर्थाने इंटरनेटची ताकद व त्याहूनही जास्त माणुसकीचं बळ दिसून येतं असं म्हणायला हरकत नाही

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiggy delivery boy emotional story stayed hungry for weeks life changed by a girl now got a good job and money svs