ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉय अनेक चांगल्या वाईट घटनांमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. सध्या असाच एक डिलिव्हरी बॉय चर्चेत आला आहे, त्याचं कारण म्हणजे त्याने आपल्या ग्राहकाला चक्क डिलीवरी दुकानापर्यंत पोहचवणार नसल्याचं सांगितलं आहे. याचे परिणामही त्याला भोगावे लागले आहेत. तर नेमकीही घटना काय आहे आणि डिलिव्हरी बॉयने ऑर्डर पोहचवण्याला विरोध का केला? ते जाणून घेऊया.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना दिल्लीच्या कश्मीरी गेट येथील प्रसिद्ध मरघट बाबा हनुमान मंदिर परिसराजवळ एका दुकानदाराने मटण कोरमाची स्विगीवरुन ऑनलाइन ऑर्डर मागवली होती. पण ही ऑर्डर घेऊन आलेला डिलिव्हरी बॉय सचिन पांचाळ याने ऑर्डर मागवणाऱ्या व्यक्तीच्या दुकानात ऑर्डर देण्यास विरोध केला. त्याचं कारण म्हणजे, मटणाची ऑर्डर ज्या ठिकाणी द्यायची होती तिथे एक हनुमान मंदिर आहे, त्यामुळे आपण मटण घेऊन मंदिर परिसरात येणार नाही, त्यामुळे तुम्ही बाहेर येऊन ऑर्डर घेऊ जा, असं डिलिव्हरी बॉयने दुकानदाराला सांगितलं.

झोमॅटो डिलिव्हरी बॉयने शिवीगाळ केल्याचा महिलेचा दावा; नेटकऱ्यांनी महिलेलाच केलं ट्रोल, पण का? जाणून घ्या नक्की काय घडलं?
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
woman trying to suicide mumbai , police saved woman Mumbai, Mumbai news,
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण
Preloved Eco Haat, used products, clothes,
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी…
Husband Killed His Wife Over Instagram Reels
Crime News : Instagram रिल्स पोस्ट करण्यावरुन वाद झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या, कुठे घडली ही घटना?
Mobile charger for five lakh, Seniors citizen cheated by cyber thieves, Seniors citizen cheated pune,
मोबाइल चार्जर पाच लाखांना, सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक
Pune Municipal Corporation has been hit by the Smart City project
पुणेकरांना ४४ कोटींचा ‘स्मार्ट’ हिसका, काय आहे प्रकरण!
Municipal Corporation employees instructed to gather feedback before closing citizen complaints on PMC Care App
तक्रारदाराची तक्रार बंद करताना पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

हेही वाचा- मुस्लिम वर आणि हिंदू वधू! मंदिरात VHP आणि RSS च्या सहकार्याने कसा पार पडला निकाह?

मात्र ग्राहकाला दुकानातच डिलिव्हरी हवी होती. या घटनेबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये डिलिव्हरी बॉय मंदिराच्या गेटबाहेर हातात मटण कोरमाची ऑर्डर घेऊन उभा असल्याचं दिसत आहे. डिलिव्हरी लोकेशन यमुना बाजार, हनुमान मंदिर दाखवत असमुळे त्याने आत जाणं टाळलं. ही घटना १ मार्चची असल्याची माहिती समोर आली आहे.

स्विगीने कामावरुन काढलं –

स्विगी डिलिव्हरी बॉयने मरघट हनुमान मंदिराच्या मंदिराच्या आतील भागात मटण कोरमा ऑर्डर पोहोचवण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, कर्तव्यात कसूर आणि ग्राहकांना ऑर्डर पोहचवण्याचं स्विगी बॉयचे कर्तव्य आहे. मात्र सचिनने ते केले नसल्याने कंपनीने त्याला कामावरुन काढलं. दरम्यान, या ऑर्डरवरुन डिलिव्हरी बॉयचे स्विगी कंपनीची ग्राहक सेवा आणि ऑर्डर बुक करणाऱ्या ग्राहकाशी फोनवर वाद झाल्याचे रेकॉर्डिंग समोर आले आहे.

हेही वाचा- भाजीविक्रेता रात्रीत बनला १७२ कोटींचा मालक! आता पोलिस ठाण्याच्या मारतोय चकरा; का ते जाणून घ्या

ज्यामध्ये डिलीव्हरी बॉय ग्राहकाला म्हणतो, “तुमचे दुकान मंदिराच्या चार भिंतींच्या आत आहे. त्यामुळे मी आत येऊ शकत नाही, जर मंदिराडवळ तुमचे दुकान नसते तर डिलीव्हरी करण्यात मला काहिच अडचण आली नसती.” यावर ग्राहक म्हणतो, मी तुमच्या कंपनीकडे वर्षभर ऑर्डर मागवतो, त्यावर मंदिराजवळ तुम्ही मटण मागवत असाल तर हे चुकीचं आहे असं डिलिव्हरी बॉय म्हणतो आणि तो ग्राहकाला ऑर्डर देत नाही. दरम्यान, डिलिव्हरी बॉयला कस्टमर केअरकडून ऑर्डर पोहचवण्यास सांगितलं जातं, त्यावर त्याने आपण मांसाहाराची ऑर्डर देण्यासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश करणार नसल्याच सांगितलं शिवाय जर असं करण्यास भाग पाडलं तर तो हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणार अशी धमकी त्याने कंपनीला दिली.

हेही पाहा- हनुमानाच्या मूर्तीसमोर महिला बॉडी बिल्डर्सचा ‘तो’ Video व्हायरल; काँग्रेस नेते गंगाजल घेऊन गेले अन् थेट…

मंदिर ट्रस्टने दिलंं नोकरीचं आश्वासन –

स्विगी डिलिव्हरी बॉयला आपली नोकरी गमवावी लागली. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी मरघट हनुमान मंदिराच्या मंदिर ट्रस्टने, मंदिराचे पावित्र्य राखल्याबद्दल डिलिव्हरी बॉयचा सन्मान केला. शिवाय मंदिराचे प्रभारी आणि विश्वस्त पंडित वैभव शर्मा म्हणाले, “धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी जे काही केलं ती त्यांची जाणीवपूर्वक आणि नैतिक कृती आहे. तो कोणत्याही गटाचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. त्याच्या नैतिक सेवेसाठी, त्याला पुन्हा नोकरी मिळेल याची आम्ही खात्री करू, तो हनुमान मंदिराच्या संकुलात सेवक असेल.” या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांच्या धार्मिक भावना भडकल्या आहेत. दिवसा मंदिरासाठी नैवेद्य बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या दुकानात मांसाहार करणाऱ्या दुकानदारावर लोक संतापले आहेत. त्यामुळे दुकानाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.