आजच्या काळात विकसित तंत्रज्ञानामुळे अनेक सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे घरपोहच सेवा देण्याची सुविधा. आज काल बाजारात अनेक डिलिव्हरी सेवा देणारे अॅप आहे जे कोणतीही गोष्ट घरपोहच देऊ शकतात तेही एका क्लिकवर. या डिलिव्हरी अॅप्समुळे अनेक लोकांना रोजगार मिळाले आहे. डिलिव्हरी एजंट म्हणून कित्येक लोक आज काम करणारे अनेक लोक मेहनतीने चार पैसे कमावत आहे. या सुविधेची मागणी वाढत असल्याने डिलिव्हरी एजंट म्हणून काम करण्यासाठी अनेकजण उत्सूक आहे. अनेकदा लोक जास्तीचे पैसे किंवा चांगला पगार मिळवा या हेतूने हे काम करतात पण काम केल्यानंतर त्यांना डिलिव्हरी एजंटला सामना कराव्या लागणाऱ्या खऱ्या अडचणींची जाणीव होते.
पण या कामादरम्यान डिलिव्हरी एजंटला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ठराविक वेळेत वस्तू पोहचवण्यासाठी धावपळ करावी लागते त्यात वेळेची मर्यादा, वाहतूक कोंडी सारख्या समस्यांमुळे या डिलिव्हरी एजंटला वेळीशी स्पर्धा करत काम करावे लागते. त्यानंतरही अनेकदा ग्राहकांकडून किंवा रेस्टॉरंटकडून डिलिव्हरी एजंटला दिल्या जाणाऱ्या वागणूकीमुळे त्यांचे काम आणखी अवघड होते. अशाच एका डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्या तरुणीने तिच्या कामात येणाऱ्या सर्वात अवघड गोष्टीबाबत खुलासा केला आहे. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.
स्विगी डिलिव्हरी एजंट अमृताने इंस्टाग्रामवर आता व्हायरल पोस्ट पोस्टमध्ये तिच्या पार्ट टाईम कामा दरम्यान सर्वात अवघड आणि सर्वात निराशाजनक पैलूबाबत खुलासा केला. आपला अभ्यास सांभाळून काम करणाऱ्या अमृताने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये आशियातील सर्वात मोठी मॉलमधून डिलिव्हरीसाठीची ऑर्डर घेण्यासाठी आली आहे पण तिथे योग्य व्यवस्था नसल्याने ही प्रक्रिया तिला वेळ खाऊ आणि थकवाणारी वाटत आहे .”
Amritha युजर नेम असलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये तिने मॉलचे नाव सांगितले नाही पण हे केरळच्या विस्तीर्ण लुलू मॉलपैकी एक असावे असा काहींनी अंदाज बांधला आहे.
व्हायरल क्लिपमध्ये, वेळ खाऊ आणि अवघड डिलिव्हरी प्रक्रियेबद्दल सांगताना अमृताने सांगितले की, प्रथम त्यांना पार्किंगमध्ये आधीपासून ठरवलेल्या ठिकाणीची गाडी पार्क करावी लागते त्यानंतर सर्व्हिस लिफ्टने फूड कोर्टपर्यंत जावे लागते जिथे भल्या मोठ्या मॉलच्या दुसर्या टोकाला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचण्यासाठी गर्दीतून चालत जाऊन वाट शोधावी लागते. हे सर्व त्यांची डिलिव्हरी सेवा सुरू होण्याआधीच प्रक्रियेत घडते. या संपूर्ण प्रक्रियेत १५-२० मिनिटे लागतात जे तिच्यासारख्या डिलिव्हरी एजंटसाठी वेळ आणि कमाई वाया घालवण्यासारखे आहे.
पेमेंट सिस्टमबद्दल बोलताना, तिने शेअर केले की स्विगी ५-किलोमीटरच्या अंतरातील डिलिव्हरीसाठी २५ रुपये देते. ही रक्कम अशा जास्तीच्या कामांसाठी केलेल्या अतिरिक्त प्रयत्नांची भरपाई करत नाही असे तिला वाटते.
“आतापर्यंतच्या सर्वात कठीण आणि द्वेषपूर्ण गोष्टी म्हणदे आम्हाला ५ किमीसाठी आम्हाला किमान २५ रुपये मिळतात. जेव्हा आम्ही मॉलमध्ये येतो तेव्हा आम्हाला डिलिव्हरी एजंटसाठी राखीव भागात गाडी पार्किंग करावी लागते आणि सर्व्हिस लिफ्ट घेऊन फूड कोर्टला जावे लागते आणि ज्या दूकानातून ऑर्डर मिळाली तिथपर्यंत चालत जावे लागते. या ऑर्डरसाठी कोणताही अतिरिक्त भत्ता मिळत नाही. त्या ऑर्डर्स घेण्यासाठी आम्ही जवळपास १०-२० मिनिटे गमावतो. तसेच, ऑर्डर घेतल्यानंतर, पटकन बाहेर पडावे लागते पण जिथे प्रचंड गर्दी असते. ”
हेही वाचा –“तूपात तूप गायीचे….”, आजोबांनी आजींसाठी घेतला भन्नाट उखाणा, सुंदर नात्याचा Viral Video एकदा बघाच
हा त्रास कमी करण्यासाठी अमृताने गोष्टी सुचवल्या. पहिली गोष्टी म्हणजे मॉलद्वारे खालच्या मजल्यांवर खाद्यपदार्थांच्या ऑर्डर घेण्याची व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून जास्त वेळ चालावे लागणार नाही आणि उशीरही होणार नाही, दुसरे, तिने स्विगीला अशा आव्हानात्मक पिकअपवर नेव्हिगेट करणाऱ्या डिलिव्हरी रायडर्सना अतिरिक्त मोबदला देण्याचे आवाहन केले.
“आमचे काम सोपे करण्यासाठी मॉल्स खालच्या स्तरावर ऑर्डर का गोळा करू शकत नाहीत? किंवा आम्हाला अतिरिक्त मोबदला का मिळत नाही,” अमृताने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.