Delivery Girl Emotional Video: आपल्या कुटुंबाची परिस्थिती कशीही असो, मुलं मोठी झाली की घरातल्या तरुण-तरुणीवर आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी येतेच. लहानपणापासून आई-वडिलांनी घेतलेले कष्ट, हालाखाची परिस्थिती असतानाही दिलेलं शिक्षण, गरिबी असतानाही मुलांचे लहान सहान हट्ट पुरवणे; या सगळ्याची जाणीव ज्या लेकराला असते तेच लेकरू आयुष्यात पुढे जातं. अशात मुली परक्याचं धन असं म्हणणाऱ्या समाजाला मुली आई-वडिलांची काळजी किती उत्तम प्रकारे घेऊ शकतात हे वेळोवेळी दाखवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशाच एका मेहनती मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी म्हणजेच डिलिव्हरी गर्ल स्विगीचे पार्सल घेऊन भरउन्हात डिलिव्हरी करताना दिसतेय.

हेही वाचा… VIDEO: “अगं काहीतरी लाज बाळग”, भररस्त्यात टॉवेल काढलं अन्…, तरुणीचा अश्लील डान्स पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

डिलिव्हरी गर्लचा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी गर्ल स्कूटरवरून स्विगीचं भलमोठं पार्सल घेऊन डिलिव्हर करायला जात आहे. भरउन्हात काम करत थकलेली भागलेली ही तरुणी हेल्मेट काढून थोडा मोकळा श्वास घेते. आपल्या कुटुंबासाठी मेहनत घेणाऱ्या या तरुणीला सध्या सोशल मीडियावर खूप प्रेम मिळतंय.

हा व्हायरल व्हिडीओ @khara__tech या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “वडिलांच्या पैशाने आणि स्वत:च्या सौंदर्याने अभिमान बाळगून जगणाऱ्या मुलींना यांचे दु:ख समजणार नाही, खरी पप्पाची परी”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल १.४ मिलियन व्हयूज आले आहेत.

हेही वाचा… जीव इतका स्वस्त असतो का? बापानं चिमुकल्याला घेऊन उचललं टोकाचं पाऊल, इमारतीच्या टोकावर उभा राहिला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ज्या मुलीला परिस्थितीची जाणीव आहे ती मुलगी कधीच चुकीच्या मार्गाला लागत नाही”, तर दुसऱ्याने “अशा मुली खूप कमी असतील, लाखात एक” अशी कमेंट केली. तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ताई तू वाघीण आहे, सलाम तुला भावाकडून”; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “पप्पाची परी नाही वाघीण आहे ही ताई… जी रोज संघर्ष करून जिद्दीने जीवन जगतेय”, “मी एकदा दोनदा अशा मुली पाहिल्या आहेत.. डोळ्यात पाणी आलं”, अशीही कमेंट एकाने केली.

\

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiggy delivery girl viral video of delivering food from scooter emotional video on social media dvr