जगात असे अनेक लोक आहेत जे अपंग आहेत. त्यापैकी काहींना पाय नाहीत, काहींना हात नाहीत, काहींना डोळे नाहीत. अनेकजण या लोकांबद्दल असा विचार करतात की ते आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. परंतु, काहीवेळा अशा गोष्टी दिसतात ज्यामुळे लोकांचा असा विचार चुकीचा असल्याचे दिसुन येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , ज्याला पाहून लोक एका अपंग महिलेच्या जिद्दीला सलाम करताना दिसत आहेत.
असं म्हणतात की जर मनात काही करण्याची इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो. हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हालाही असेच काहीसे वाटेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला व्हीलचेअरच्या मदतीने फूड डिलिव्हरीचे काम करताना दिसते आहे. तिच्यासोबत तिने फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीची बॅग ठेवली आहे आणि महिलेने स्विगी टी- शर्ट देखील घातला आहे.
( हे ही वाचा: राहुल गांधींनी ४१ हजारांचा टी-शर्ट घातला? भाजपच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावरही रंगली चर्चा)
व्हिडीओ पाहून असे दिसते की ही महिला फूड डिलिव्हरी एजंट आहे आणि स्विगीसाठी काम करते. ती बहुधा कुठेतरी फूड डिलिव्हरी करण्यासाठी जात आहे. एका अपंग महिलेची ही काम करण्याची जिद्द पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिला सलाम करत आहेत. जिथे लोक प्रत्येक प्रकारे फिट असूनही काम मिळत नाही म्हणून दुःखी आहेत. त्यांनी या महिलेकडून नक्कीच शिकले पाहिजे.
पाहा महिलेचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
( हे ही वाचा: Video: मध्यरात्री भररस्त्यात जोडप्याने केला रोमँटिक डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल)
हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे. अवघ्या ६ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे.
त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘दिल से सलाम. आम्हाला मुलींचा अभिमान आहे’, तर दुसर्या यूजरने लिहिले की, ‘महिला आणि तिच्या मेहनतीला सलाम करतो.