Swiggy Tweet On G20 Summit 2023 : दिल्लीत जी-२० समूहाची शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या परिषदेत ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि अधिकारी दिल्लीत पोहोचले आहेत. विदेशातून आलेल्या पाहूण्यांचं स्वागत करण्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. स्विगीनेही एक भन्नाट ट्वीट करून इंटरनेटवर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्विगी एक फूड डिलिव्हरी सर्व्हिस आहे, पण नुकतच जी-२० शिखर परिषदेबाबत ट्वीट करून स्विगी प्रकाशझोतात आलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून स्विगीने यूजर्सच्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
एकीकडे जी-२० परिषदेत जगभरातील गंभीर विषयांवर चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे स्विगीने या ट्रेंडिग मुद्द्यांवर ट्वीट करून यूजर्सचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं आहे. स्विगीने त्यांच्या ट्वीटमध्ये एक चहाचा कप शेअर केला आहे. विशेष म्हणजे, या चहाच्या कपाच्या जवळ पारले-जी बिस्किट ठेवण्यात आले आहेत. जी-२० परिषद असल्याने बिस्किटही २० ठेवण्यात आले आहेत. ट्वीट पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, पारले-जी २० समिटमध्ये तुमचं स्वागत आहे.
बालपणीच्या आठवणी झाल्या ताज्या
या ट्वीटच्या माध्यमातून स्विगीने यूजर्सच्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. एका यूजरने ट्वीटरवर रिप्लाय देत म्हटलं की, मला माझं बालपण आठवलं. काही यूजर्सने स्विगीच्या या क्रिएटिव्हीटीचं कौतुक केलं. तर काही यूजर्सने स्विगीच्या सर्व्हिसवर नाराजी व्यक्त केलीय. तर काहींनी मजेशीर इमोजी सेंड करून विनोद करण्याचा प्रयत्न केलाय.
७ सप्टेंबरला शेअर केलेल्या या व्हिडीओला लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे. या व्हिडीओला ५० हजारांहून अधिक व्यूज मिळाले असून हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका यूजरने म्हटलंय, जय हिंद की वीर सेना..भारताला १ डिसेंबर २०२२ ला जी-२० परिषदेचं अध्यक्षपद दिलं होतं. जी-२० चे आतापर्यंत ६० हून अधिक शहरांमध्ये २०० पेक्षा जास्त प्रोग्राम आयोजित करण्यात आले आहेत.