जर एखाद्या मुलाला फोन कसा वापरायाचा माहित असेल तर टॉयलेट कसे वापरावे हे देखील माहित असते. हे सर्वांना माहित आहे पण एक असा देशही आहे जिथे मुलं अकरा वर्षाच्या वयामध्येही डायपर घालून शाळेत जातात. या मुलांना टॉयलेट कसे वापरायचे हे माहित नाही. हे प्रकरण स्विझरलँडमधील आहे. जिथे शाळेतील शिक्षकांची तक्रार आहे की बरेच विद्यार्थी वर्गात डायपर घालून येतात कारण त्यांना टॉयलेट कसे वापरायचे हेच माहित नाही.
न्युयॉर्क पोस्ट्च्या रिपोर्टनुसार स्विस फेडरेशन ऑफ टीचर्सचे हेड डॅगमार रोसलर यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, मुलं साधारण ४ वर्षाच्या वयामध्ये शाळेत जायला सुरुवात करतात पण कित्येक लोक अजूनही डायपरचा वापरताना दिसत आहे. पण जेव्हा ११ वर्षाची मुलं जेव्हा डायपर घालून शाळेत येत असतील तर नक्कीच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. कित्येक मुलं डायपर परिधान करण्याची इतकी सवय झालेली असते ती जाणूनबुजून टॉयलेटचा वापर करत नाही किंवा विसरून जातात. आई-वडील मुलांना स्वत:या गोष्टी शिकवत नाही. या देशामध्ये या ट्रेनिंगसाठी सेशन होतात पण ते मुलांना तिथे घेऊन येत नाही.
हेही वाचा – रेस्टॉरंटमध्ये आलं भयानक वादळ, अचानक उडू लागले लोक! थरारक व्हिडिओ आला समोर
काय आहे यामागील कारण?
एज्युकेशन सायटिंस्ट मार्गरिट स्टाम यांचा म्हणणे आहे की, काही पालकांना मुलांनी डायपर परिधान करणे जास्त सोयीस्कर वाटते. हे आजच्या काळामध्ये मोठी समस्या नसली तर त्यामुळे चुकीचा संदेश दिला जात आहे.
हेही वाचा – ‘या’ देशात राहण्यासाठी तुम्हाला मिळतील ७१ लाख रुपये, फक्त ही अट करावी लागेल पूर्ण
बालविकास तज्ज्ञ रिटा मेस्मर यांनी सांगितले की, ”डायपर घालून शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक ११ वर्षांचा मुलगा त्याच्याकडे आला, ज्याला अद्याप शौचालय कसे वापरायचे हे माहित नाही. मुलांना या प्रकरणाची काहीच माहिती नाही, यामुळे शिक्षक अडचणीत येतात. ज्यांना मुलांचे डायपर बदलायला मदत करायची आहे. याबाबत शिक्षकांनी पालकांविरोधात संताप व्यक्त केला आहे.