सिडनीच्या मत्सालयात राहणारे स्फेन आणि मॅजिक हे गे जोडपं गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. हे जोडपं महिन्याभरापासून अंड उबवत होतं. अखेर या अंड्यातून चिमुकल्या पिल्लाचा जन्म झाला आहे. सिडनीच्या मत्सालयात जन्मलेले आणि गे पेंग्विनकडून उबवलेलं हे पहिलं अंटार्क्टिक पेंग्विनचं पिल्लू आहे. पिल्लाच्या जन्मानंतर सुरुवातीचे २० दिवस हे त्याच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे दिवस असतात. या काळात अनेक पिल्लं दगावतात. पण स्फेन आणि मॅजिकच्या पिल्लाची प्रकृती उत्तम उसून ते दोघंही त्याची विशेष काळजी घेत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in