T-20 World Cup : भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण देश विजय साजरा करताना दिसत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या शहरातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रत्येक शहरात क्रिकेटप्रेमी आनंद साजरा करताना दिसले. सध्या असाच पुण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पुण्यात एफसी रोडवर लोक जोरदार सेलिब्रेशन करताना दिसले. काही लोक तर पीएमपीएमएलच्या चालत्या बसवर चढून नाचताना दिसले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील एफसी रोडवरील आहे. २९ जून रोजी रात्री भारताने टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर येथे लोक जंगी सेलिब्रेशन करताना दिसले. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही लोक रस्त्यावर नाचताना दिसत आहे तर काही लोक देशाचा तिरंगा हातात घेऊन उड्या मारत आहे. काही लोक तर चक्क पुणे महानगरपालिकेच्या चालत्या बसवर चढून नाचताना दिसले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Election symbol chappal candidate unique campaign in Yavatmal watch viral video
Video : निवडणूक चिन्ह चप्पल, उमेदवार करतो पदस्पर्श, यवतमाळमध्ये अनोखा प्रचार
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग

हेेही वाचा : मोदींनी हात मिळवायला आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे दुर्लक्ष करून घेतली मेलोनी यांची भेट? Video लोकांना आवडला पण खरं काय?

पाहा व्हायरल व्हिडीओ

punekar_sushil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” जिंकल्यानंतर पुणे येथील एफसी रोडवर” जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून या व्हिडीओच्या अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” तर एका युजरने लिहिलेय, “सर्व ठीक आहे पण बसवर चढण्याची काय गरज आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पीएमटीवर चढून नाचण्यापेक्षा यांनी स्वतःच्या गाड्यांवर चढून नाचावे आणि आनंद साजरा करावा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी पीएमटीवर चढून डान्स केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

हेेही वाचा : खाकीला कडक सॅल्यूट! खवळलेल्या समुद्रात पाय घसरुन पडली महिला, मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे वाचवले प्राण; पाहा video

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आणि तब्बल १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक सुद्धा जिंकला होता.