टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताच्या पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर, संपूर्ण देशभरात निरपेक्ष गोंधळ उडाला आहे. पण प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या बाबतीत असे होत नाही. विशेष म्हणजे, UAE मध्ये सामना पाहणाऱ्या या भारतीय क्रिकेट चाहत्याला आणि भारताच्या पराभवानंतरही तो का हसत होता, असे विचारण्यात आले.या माणसाने दाखविलेल्या सकारात्मक उत्मुतराळेच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला आत्तापर्यंत जवळ जवळ १५३.८ हजार लोकांनी बघितलं आहे. हा व्हिडीओ उबेद रहमान या ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केला आहे. अवघ्या ५२ सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तर १६ हजाराहून जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

खरा क्रिकेटचा चाहता असाच दिसतो. शेवटी तो फक्त एक खेळ आहे, नाही का? अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओ खाली करत त्या व्हिडीओतील व्यक्तीला सपोर्ट केला जात आहे.

Story img Loader