IND vs ZIM Viral Video: T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना हा सूर्यकुमार यादवच्या तळपत्या खेळीमुळे चर्चेत राहिला, विचारपलीकडचे शॉट्स सूर्य मैदानात खेळला, अगदी सामना संपल्यावरही अनेकांना त्याने मारलेले षटकार नेमके कसे शक्य झाले हे कळत नव्हते. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर थेट सूर्याला त्याचं गुपित विचारलं. पण या सगळ्या पोस्ट मॅच मुलाखतींमध्ये अचानक आता रविचंद्रन आश्विनचं नाव ट्रेंड होऊ लागलं आहे. आश्विनने भर मैदानात केलेल्या त्या कृतीमुळे नेटकरी पार लोटपोट झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघातील सध्याचा सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणजे रविचंद्रन आश्विन. अश्विनच्या अनुभवाचा व खेळाच्या अभ्यासाचा प्रत्यय वेळोवेळी सामन्यांमध्ये आला आहे. पण याच अश्विनचा एक भलताच व्हिडीओ सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल १५ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. कदाचित आश्विनला त्यावेळी आपण कॅमेऱ्यात दिसू याची कल्पना नसावी पण कॅमेरामनच्या नजरेतून आश्विनची ही एक कृती काही सुटलेली नाही.

नेमकं झालं असं की, अश्विनला आपलं टीशर्ट शोधायचं होतं, अनेकदा मॅचच्या गडबडीत सर्वच खेळाडूंचे कपडे एकत्र मिक्स होतात, यात आपलं टीशर्ट ओळखण्यासाठी आश्विन चक्क टीशर्टचा वास घेताना दिसत आहे. हे पाहून अनेक भारतीयांना आपल्या हॉस्टेलचे दिवस आठवले आहेत. आपले कपडे लेखण्याची हीच खरी पद्धत आहे असेही अनेकांनी म्हंटले आहे.

हरभजनने शेअर केला रविचंद्रन आश्विनचा व्हायरल व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Video: विराटला बर्थडे सरप्राईझ द्यायला गेली अनुष्का शर्मा, अशी फजिती झाली की केक घेऊन जमिनीवर आदळली

दरम्यान, भारतीय संघाचा झिम्बाम्बावे विरुद्ध सामना एकतर्फी ठरला. नाणेफेकीच्या वेळीच हा सामना भारतीय संघांची गोलंदाजांची फळी कितपत तयार आहे हे ठरवणारा असेल असे रोहित शर्माने सांगितले होते. यासाठीच सुरुवातीला फलंदाजी करून भारतीय संघाने मोठे लक्ष्य उभे केले. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, याकन्हाय भेदक गोलंदाजीमुळे झिम्बाम्बावेचा संपूर्ण संघ आल्या पावली पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup ind vs zim rohit sharma r ashwin viral video of sniffing vaist netizens trolling team indian bowler funny memes svs