भारताने गुरुवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात तुलनेने दुबळ्या नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. भारताच्या डावातील पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मात्र, भारतीय फलंदाजांनी आक्रमक शैलीत खेळण्यास सुरुवात केल्यानंतर नेदरलँड्सच्या गोलंदाजांना दडपण हाताळता आले नाही. विराट आणि सूर्यकुमारने तर मनसोक्त फटकेबाजी केली. या दोघांच्या नाबाद भागीदारीनंतर गोलंदाजांनी विजयाचा कळस चढवला. या दोघांच्या फलंदाजीची सोशल मीडियावर चर्चा असतानाच विराट कोहलीने सामन्यानंतर केलेल्या एका पोस्टवर मराठीत कमेंट दिल्याचंही पहायला मिळालं.

नक्की पाहा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली. रोहित (३९ चेंडूंत ५३ धावा), विराट (४४ चेंडूंत नाबाद ६२) आणि सूर्यकुमार (२५ चेंडूंत नाबाद ५१) यांनी अप्रतिम खेळी केल्या. रोहितने विराटसोबत ७३ धावांची भागीदारी रचली. रोहित बाद झाला, त्यावेळी भारताची १२ षटकांत २ बाद ८४ अशी धावसंख्या होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने सुरुवातीपासूनच नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याला विराटनेही तोलामोलाची साथ दिली.

नक्की वाचा >> Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..

विराट आणि सूर्यकुमार या दोघांनी फटकेबाजी करताना अखेरच्या आठ षटकांत ९५ धावांची भर घातली. गेल्या सामन्यातील खेळीनंतर आत्मविश्वास उंचावलेल्या विराटने नाबाद ६२ धावा करताना तीन चौकार आणि दोन षटकार मारले. दुसरीकडे मैदानाच्या विविध कोपऱ्यांत फटके मारताना सूर्यकुमारने २५ चेंडूंतच नाबाद ५१ धावांची तडाखेबंद खेळी केली. यात सात चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. भारतीय इनिंगमधील शेवटच्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर विराट अन् सुर्यकुमारने केलेलं सेलिब्रेशनही चांगलेच चर्चेत राहिले. या सामन्यामध्ये विराट आणि सूर्यकुमारने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये ९५ धावांची नाबाद पार्टनरशीप केली.

नक्की वाचा >> पाकिस्तान T20 World Cup मधून जवळजवळ बाहेर! मात्र भारताच्या हाती आहे पाकच्या सेमी फायनलचं तिकीट; समजून घ्या Points Table

या दोघांमधील हा बॉण्ड सामना संपल्यानंतरही मैदानाबाहेर म्हणजेच सोशल मीडियावरही दिसून आला. सामन्यानंतर विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामन्यातील काही फोटो पोस्ट करत, “आणखीन एक दमदार निकाल” अशा कॅप्शनसहीत पोस्ट केली. या पोस्टमध्ये चार फोटोंचा समावेश असून कॅप्शननंतर भारतीय झेंड्याचा आणि ताकद दर्शवणाऱ्या दंडांचे इमोजी वापरण्यात आले आहेत. या चार फोटोंपैकी एक फोटो सूर्यकुमारबरोबर फलंदाजीदरम्यानचा आहे.

नक्की वाचा >> India Beats Netherlands: विजयानंतर काही मिनिटांमध्ये ‘ती’ पोस्ट करणं दिनेश कार्तिकला महागात पडलं; अनेकांनी झापलं

याच फोटोवर सूर्यकुमारने कमेंट करताना त्याच्या आणि विराटच्या जोडीसाठी एक भन्नाट नाव दिलं आहे. सूर्यकुमार यादवने त्याच्या अकाऊटवरुन ‘सूरवीर’ अशी कमेंट या पोस्टवर केली आहे. या कमेंटला ५२ हजारांहून अधिक लाइक्स आहेत.

विशेष म्हणजेच सूर्यकुमारच्या या कमेंटवर विराटनेही दोन शब्दांमध्ये रिप्लाय दिला आहे. खास बाब ही की त्याने हा रिप्लाय मराठीमध्ये दिला आहे. सूर्यकुमारने दोघांच्या जोडीसाठी दिलेलं नाव पाहून विराटने कमेंटमध्ये आधी हसू आल्याचं दर्शवलं आहे नंतर ‘मानला भाऊ’ असं म्हणत फायर इमोजी वापरला आहे.

सूर्यकुमार हा मूळचा मुंबईचा असून आयपीएलदरम्यान अनेकदा त्याने ऑनलाइन संवादामध्ये मराठीत गप्पा मारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच विराटने कालच्या त्याच्या खेळीचा संदर्भ आणि त्याने दिलेल्या या अनोख्या नावावर ‘मानला’ भाऊ असं म्हणत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Story img Loader