ताडोबा राष्ट्रीय उद्यानातला एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी वाघांना प्राण्यांची शिकार करताना तुम्ही पाहिलं असेल. पण ताडोबातील तारा वाघिणीच्या बछड्यानं जे केलं ते पाहून पर्यटकही चक्रावून गेले. येथील जंगलात काम करणाऱ्या मजुरांनी एका जागेवर आपले डबे एकत्रितपणे ठेवले होते. त्यानंतर मजूर जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कामावर निघून गेले. थोड्यावेळानंतर याठिकाणी वाघाचा एक बछडा आला. त्याच्या दृष्टीस हे डबे पडले. तो बराच वेळ या डब्यांकडे पाहत होता. अखेर बराच वेळ डब्यांजवळ घुटमळल्यानंतर त्यानं डब्याची एक पिशवी तोंडात पकडली आणि पळ काढला. त्याच्या अशा वागण्यानं कर्माचारी आणि पर्यटकही चक्रावून गेले. ताडोबा अभयारण्यात अनेक मजूर काम करतात. हे मजूर आपल्यासोबत आणलेला डबा एका ठिकाणी ठेऊन दुसऱ्या ठिकाणी कामाला जातात. डब्याजवळ कोणी नाही हे पाहून एक वाघ त्या ठिकाणी आला त्यानं आजुबाजूला पाहिलं आणि एक डबा घेऊन निघून गेला. हा बछडा पंधरा महिन्यांचा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा अभयारण्यात सध्या ६२ वाघ आहेत.

Story img Loader