Taiwan Earthquake Train : तैवानमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे तीन मजली इमारत कोसळली आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. २४ तासांत येथे दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल असून उजिंग जिल्ह्याला त्याचा फटका बसला आहे. शनिवारीही इथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. आग्नेय तैवानला ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे येथे एक इमारत कोसळून रस्ते खचले होते. हा भूकंप इतका भयंकर होता की अक्षरशः रेल्वे सुद्धा अगदी खेळण्यासारखी पटरीवर हादरली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहताना अनेकांच्या छातीत धस्स होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तैवानमध्ये रविवारी झालेल्या भूकंपाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. रविवारी, १८ सप्टेंबर रोजी तैवानच्या युजिंगच्या पूर्वेला ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यात इथल्या लोकांचं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, तैतुंग शहराच्या उत्तरेस सुमारे ५० किलोमीटर (३० मैल) रात्री ९.३० वाजता (१३३० GMT) नंतर ६.५ रिश्टर स्केलचा भूकंप आल्यानंतर पुन्हा हा दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला.
आणखी वाचा : शेकडो मगरींनी एकत्र येऊन शहरावर केला हल्ला? VIRAL VIDEO मुळे लोकांमध्ये दहशत
यादरम्यान युली शहराजवळ तीन मजली इमारत कोसळली. त्याखाली बरीच दुकाने होती आणि त्यांच्या वरील मजल्यांवरील घरांमध्ये लोक राहत होते. अनेक रस्त्यांना तडा गेल्याचं चित्र दिसून आलं. पूल देखील कोसळले आहेत. त्यासोबतच काही वाहनंदेखील खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : पाण्याखाली ‘मूनवॉक’ करणाऱ्या मुलाचा VIDEO VIRAL, परफॉर्मन्स पाहून थक्क व्हाल
हा व्हिडीओ येथील रेल्वे स्टेशनचा आहे ज्यात प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन उभी असल्याचे दिसून येते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर काही प्रवासी आपल्या ट्रेनची वाट पाहत बसलेले दिसत आहेत. अचानक जमिनीत भूकंपाचे धक्का जाणवून आपल्या समोर पटरीवर थांबलेली ट्रेनसुद्धा गदागदा हलू लागल्याचं प्रवाश्यांनी पाहिलं. हे पाहून प्रवासी घाबरून गेले. काही प्रवासी प्रसंगावधान दाखवून खांब्याला धरून बसलेले आहेत. शनिवारपासून बेटाच्या आग्नेय भागात जाणवलेल्या डझनभर भूकंपांपैकी हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : भाची हरवल्याची तक्रार करणाऱ्याला इन्स्पेक्टरने चपराक मारली, आता बदली झाली
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO
मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. लोक मोठ्या संख्येने हा व्हिडीओ पाहत असून हा व्हिडीओ पाहत असताना अंगावर शहारे उभे राहतात. हा व्हिडीओ MadhawTiwari नावाच्य ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत असून तैवानमधल्या भूकंपाचा कहर किती भयानक होता, याचा अंदाज येतो. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया शेअर करत भूकंपादरम्यान काय काळजी घ्यायला हवी, याबाबत माहिती लोकांपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत.