Taiwan Earthquake Viral Video: बुधवारी सकाळी तैवानच्या पूर्व किनार्याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. भूकंपानंतर तैवानमधील किनारपट्टी भागांना आणि शेजारील काही देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंप इतका जोरदार होता की अनेक इमारती कोसळल्या. त्सुनामीने जपानच्या दोन बेटांनाही तडाखा दिला. भूकंपानंतर लोक जीव वाचताना दिसले. याचे अनेक व्हिडीओ समोर आले असताना असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉक्टर म्हणजे माणसातला देव, एक असा देव जो संकटकाळी धावून येतो आणि आयुष्याला नवसंजीवनी देतो.याचंच एक उदाहरण या भूकंपावेळी पाहायला मिळालंय.
खरंतर हा व्हिडीओ रुग्णालयाच्या आतमधला आहे. अचानक भूकंप झाल्यानंतर तिथे काम करणाऱ्या नर्स ताबडतोब खोलीत येतात जिथे नवजात बालकांना ठेवले जाते. त्या खोलीत आधीच तीन परिचारिका हजर होत्या आणि मुलांचे प्राण वाचवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भूकंपाचे धक्के बसताच दुसरी एक परिचारिका धावत धावत आली आणि मुलांना एकत्र आणण्यास मदत करू लागली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ X वर @IamNishantSh नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शन लिहिले, “भूकंपाच्या वेळी मुलांचे रक्षण करणाऱ्या तैवानच्या परिचारिका. आज मी इंटरनेटवर पाहिलेल्या सर्वात सुंदर व्हिडिओंपैकी हा एक आहे. या शूर महिलांना सलाम.” असं कॅप्शन दिलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Loksabha Election: तुमची दाढी करून देतो पण मत द्या; प्रचारासाठी उमेदवारानं हाती घेतला वस्तारा, पुढे काय घडलं पाहा
व्हिडिओ २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला
हा ३१ सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका यूजरने लिहिले की, “आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “जगात अजूनही काही लोक आहेत ज्यांना इतरांची काळजी आहे.” त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, मला आशा आहे की ते सर्व सुरक्षित असतील.