अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता तालिबानने महिलांना शरिया कायद्याअंतर्गत वागणूक दिली जाणार असल्याची घोषणा केलीय. मात्र असं असतानाच दुसरीकडे तालिबानसाठी काम करणाऱ्या काही तरुणांना या दहशतवादी गटाने किल लिस्ट बनवण्याचं काम दिलं आहे. पॉर्न वेबसाइट्सशीसंबंधित महिलांना ठार करण्याची योजना तालिबानने या किल लिस्टच्या नावाखाली तयार केल्याचं द सनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तालिबानसाठी काम करणारे अनेक तरुण सध्या पॉर्न वेबसाइट्सवर अफगाणिस्तानमधील महिला आणि काही कंटेट सापडतोय का त्याचा तपास घेतायत. यामध्ये कोणी आढळून आल्यास या सेक्स वर्कर्सला सार्वजनिक पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा महिला सापडल्यास तालिबान त्यांचा लैंगिक छळ सुद्धा करण्याची भीती व्यक्त केली जातेय. तालिबानमध्ये दहशतवादी अनेकदा महिलांना ठार मारण्याआधी त्यांच्यावर बलात्कार करतात.

नक्की वाचा >> तालिबानचा म्होरक्या नाही तर ‘या’ नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणार अफगाणिस्तानमधील नवं सरकार

तालिबानसाठी काम करणाऱ्या मुलांच्या हाती असे काही व्हिडीओ लागले आहेत ज्यामध्ये अफगाणिस्तानमधील महिला पाश्चिमात्य देशांमधील पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतानाचे क्षण चित्रित करण्यात आलेत. हे व्हिडीओ समोर आल्यानंतर या महिला कोण आहेत त्याचा शोध घेण्यासाठी तालिबानने आता मोठी मोहीम हाती घेतली आहे. १९९६ ते २००१ दरम्यान देशात तालिबानची सत्ता होती तेव्हा अनेकदा येथे महिलांना सार्वजनिक पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. तालिबानच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशांमध्ये हाच नियम लागू करण्यात आला होता. तालिबानचे दहशतवादी लग्नाशिवाय शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांची हत्या करतात. मात्र हा नियम तालिबान्यांना तसेच पुरुषांना लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्याभिचाराच्या गुन्ह्याखाली पुरुषांना मृत्यूदंडाची शिक्षा केली जात नाही.

नक्की वाचा >> एक फोटो आणि नाव… जगाला एवढीच ओळख असणारा ‘तालिबान’चा म्होरक्या आणि त्याच्याबद्दलचं गूढ

अफगाणिस्तानमध्ये वेश्या व्यवसाय हा बेकायदेशीर आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये देशामध्ये बेकायदेशीरपद्धतीने देहविक्री करणाऱ्या महिलांबरोबरच पुरुषांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या बेरोजगारीमुळे अनेकजण या नकोश्या व्यवसायामध्य ढकलेले गेले. एका सेक्स वर्करने दिलेल्या माहितीनुसार छोटा भाऊ आजारी असल्याने आणि घरातील पाच जणांच्या अन्नपाण्याची सोय करण्यासाठी कमाई करण्याची जबाबदारी असल्याने या व्यवसायामध्ये तिने पाऊल ठेवलं. २० वर्षांच्या या मुलीने दर आठवड्याला आपल्याला तीन पुरुषांसोबत संबंध ठेवावे लागतात असंही सांगितलं. तसेच पुढे तिने यासाठी मला प्रत्येक ग्राहकाकडून दोन हजार अफगाणी रुपये मिळतात असंही सांगितलं.

नक्की वाचा >> “कदाचित माझ्या मुलाच्या ‘त्या’ इच्छेसाठी मी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला असावा”; बायडेन यांचं भावनिक वक्तव्य

मानवाधिकार संघटनांनी जूनमध्ये दिलेल्या इशाऱ्यानुसार अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये शेकडोच्या संख्येने देहविक्री करणाऱ्या महिला आणि पुरुष होते. ही वेश्यालये घरांमध्ये, कॉफीच्या दुकांनामध्ये आणि ब्यूटीपार्लरच्या नावाखाली चालवली जायची.