अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता तालिबानने महिलांना शरिया कायद्याअंतर्गत वागणूक दिली जाणार असल्याची घोषणा केलीय. मात्र असं असतानाच दुसरीकडे तालिबानसाठी काम करणाऱ्या काही तरुणांना या दहशतवादी गटाने किल लिस्ट बनवण्याचं काम दिलं आहे. पॉर्न वेबसाइट्सशीसंबंधित महिलांना ठार करण्याची योजना तालिबानने या किल लिस्टच्या नावाखाली तयार केल्याचं द सनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तालिबानसाठी काम करणारे अनेक तरुण सध्या पॉर्न वेबसाइट्सवर अफगाणिस्तानमधील महिला आणि काही कंटेट सापडतोय का त्याचा तपास घेतायत. यामध्ये कोणी आढळून आल्यास या सेक्स वर्कर्सला सार्वजनिक पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा महिला सापडल्यास तालिबान त्यांचा लैंगिक छळ सुद्धा करण्याची भीती व्यक्त केली जातेय. तालिबानमध्ये दहशतवादी अनेकदा महिलांना ठार मारण्याआधी त्यांच्यावर बलात्कार करतात.
तालिबानमधील तरुण पॉर्न वेबसाइट्सवरुन तयार करतायत Kill List; जाणून घ्या काय आहे प्रकरण
तालिबानसाठी काम करणाऱ्या काही तरुणांना या दहशतवादी गटाने किल लिस्ट बनवण्याचं काम दिलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-09-2021 at 15:31 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban death squads trawl porn sites to compile kill list of afghan prostitutes after us withdrawal scsg