Tamhini ghat accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवे, नागमोडी रस्ता व घाटमार्ग या ठिकाणी वाचलं आहे. कारण- वेगानं गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीनं सुखरूप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्याचा मथितार्थ आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारी एक दुर्घटना समोर आली आहे. वाहनचालक कितीही अनुभवी असला तरी घाटात गाडी चालवणे म्हणजे धोका असतोच. कधी पटकन कोणतं वळण येईल आणि गाडी थेट दरीत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे घाटात गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला जातो.
पावसाळ्यात ताम्हिणी घाटात कार घेऊन जाताय?
लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य हे पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे वीकेंडच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंट्सवर गर्दी करीत आहेत. तुम्हीही या वीकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखत असाल, तर हा व्हिडीओ एकदा नक्की बघा. ताम्हिणी घाटातला आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ताम्हिणी घाटात १ जुलैला नेमकं काय घडलं? पाहा. दरम्यान, ताम्हिणी घाटातला हा व्हिडीओ पाहाल, तर यापुढे कधीच पावसाळ्यात ताम्हिणी घाटात कार घेऊन जाणार नाही.
ताम्हिणी घाटात १ जुलैला नेमकं काय घडलं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घाटातील रस्त्यावरून ही कार थेट रस्ता सोडून जंगालात गेली आहे. पावसाळ्यात घाटामध्ये अपघात होण्याचं प्रमाण जास्त असतं. अशा वेळी गाडी सावकाश चालवणं गरजेचं असतं. काही दिवसांपूर्वी भुशी डॅम परिसरात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ताम्हिणीतदेखील अतिउत्साहाच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान, आता ताम्हिणी घाटातला नवा व्हिडीओ समोर आला आहे. घाटातील आनंद लुटायला जाताना हे लक्षात ठेवा की, हे आयुष्य पुन्हा नाही. हा अपघात १ जुलै रोजी झाला असून, त्या कारला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
लोणावळा, मावळ या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणी असलेल्या धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्याने येथे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील निसर्गाचा आनंद घेताना इतरांच्या जीवाला धोका होऊ नये याची काळजी घेणेही आवश्यक आहे. काही दिवसांपासून पर्यटनस्थळांवर अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत.
हा व्हिडीओ shri_exposure नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.