तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये एका हत्तिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वीटभट्टीजवळ अशक्त हत्तीण फिरत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी कोईम्बतूर जिल्ह्यातील थडागाम वन परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांना कळवले तेव्हा ही घटना उघडकीस आली.
देशी बॉम्ब तोंडात फुटल्याने हत्तिणीचा उपासमारीने मृत्यू
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे मंगळवारी एका सहा वर्षांच्या हत्तिणीचा उपासमारीने मृत्यू झाला. कारण देशी बनावटीच्या बॉम्बच्या स्फोटामुळे तिच्या तोंडाला जखम झाली होती. त्यामुळे ती काहीही खाऊ शकत नव्हती. या देशी बॉम्बवर आधीच बंदी घालण्यात आली होती.
स्थानिक लोक वापरतात अवुत्तुकाई देशी बॉम्ब
वन्य डुकरांना त्यांच्या शेतात जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी स्थानिक लोकांकडून अवुत्तुकाई Avuttukai) नावाने ओळखला जाणारा हा बॉम्ब सामान्यत: फळ किंवा भाजीमध्ये लपवून ठेवला जातो. जेव्हा एखादा प्राणी अवुत्तुकाईला खातो तेव्हा त्याचा स्फोट होतो, ज्यामुळे प्राण्याच्या तोंडाला गंभीर इजा होते.
हेही वाचा – नवऱ्याला नीट भाजी आणता येईना, वैतागलेल्या पत्नीने दिली हटके यादी, व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही येईल हसू
अवुत्तुकाईमुळे झाली हत्तिणीला जखम
थडागाम वन परिक्षेत्रातील स्थानिकांनी वन अधिकार्यांना एक अशक्त हत्तीण वीटभट्टीजवळ फिरत असल्याची माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी आणि पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अशक्त आणि आजारी हत्तिणीला इंट्राव्हेनोस औषध ( intravenous medicine) आणि ग्लुकोज (IV) दिले. पशुवैद्यकीय पथकाने ओळखले की, हत्तिणीने ‘अवुत्तुकाई’ नावाचा देशी बॉम्ब चावला होता, ज्यावर बंदी आहे.
हेही वाचा – ”प्राथमिक शिक्षक होणे सोपे नाही…” विद्यार्थ्यांबरोबर कसा जातो शिक्षकांचा एक दिवस? व्हायरल व्हिडीओ पाहाच
वन अधिकार्यांचा शोध सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्तिण अलीकडेच केरळमधून तामिळनाडूच्या जंगलात दाखल झाली होती.
अवुत्तुकाईमुळे या हत्तिणीला केव्हा आणि कुठे दुखापत झाली हे शोधण्यासाठी अधिकारी चौकशी सुरू करणार आहेत.