सरकारी शाळांची दुरवस्था लक्षात घेता अनेक पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करतात. पण त्या गरीब कुटुंबांचे काय ज्यांचं हातावर पोट असतं किंवा सरकारी शाळांवर अवलंबून राहून आपल्या मुलांना चांगल्या भविष्यासाठी पाठवतात. या प्रकरणाबाबत ग्रामसभेत शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संयमाचा बांध फुटला. मुख्याध्यापकांनी शाळेची वाईट स्थिती तर सांगितलीच पण ती सुधारण्यास सक्षम अधिकारी गटविकास अधिकारी (बीडीओ) यांचं दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं.
खरं तर हे संपूर्ण प्रकरण तामिळनाडूच्या कृष्णगिरीच्या माथुरमधील सलामराथुपट्टी या गावातील एका सरकारी शाळेचे आहे, जिथे ग्रामसभेत शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या दयनीय अवस्थेबाबत प्रश्न विचारले जातात. ओलाईपट्टीच्या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावर उत्तर देताना जे काही सांगितले, ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. ते म्हणाले की, ज्या शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव आहे, त्या शाळेत ९५ विद्यार्थी शिकत आहेत, त्यावर मात करण्यासाठी त्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागत असून त्याचाही उपयोग होत नाही. ६० वर्षे जुनी इमारत मोडकळीस आली असून, एलकेजी ते तिसऱ्या इयत्तेसाठी एकच खोली आहे, तर चौथ्या आणि पाचव्या इयत्तेसाठी एक खोली आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांना शिकवण्यासाठी जागाच नाही, असा दावा त्यांनी केला.
मुख्याध्यापक म्हणाले, ग्रामसभेच्या सभांमध्ये मी याचा सातत्याने उल्लेख करत असतो. आम्हाला इमारत, स्नानगृह, कंपाऊंड आणि मैदान हवे आहे. पालकांनाही आपल्या मुलांना चांगली इमारत असलेल्या शाळेत पाठवायचे असते. ते म्हणाले, ‘या शाळेत आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिकत आहेत, म्हणजे ते १३ वर्षांपर्यंतचे असतील आणि त्यांनी चांगले खेळले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या विकासात मदत होईल… पण दुर्दैवाने आपल्या शाळांमध्ये असे काही नाही. हे सांगताना मुख्याध्यापकांचा संताप अनावर झाला, त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्याध्यापक शक्ती म्हणाल्या की, शाळेत ५०० मीटरपर्यंत वायरिंग करायची आहे आणि जी काही वायर टाकली आहे ती सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही ज्यामुळे ‘अर्थिंग’ होते आणि मुलांच्या सुरक्षिततेची भीती कायम आहे. पुढे त्या म्हणाल्या, ‘मी बीडीओ ऑफिसमध्ये जाऊन पत्र दिले पण ते म्हणाले २५,००० ते ३०,००० रुपये लागतील, हे काम नाही होणार.’ काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला स्वतःहून खर्च करण्यास सांगितले. आम्ही आमच्या कामासाठी कमिशन घेतो का? आम्ही वीज तोडल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही मोटर पंप वापरू शकत नाही, असं देखील ते म्हणाले.
याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून सरकारी शाळेच्या गुणवत्तेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करू लागले आहेत.