प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं आपण ऐकत आलोय तेव्हा आपलं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे त्यांच्यासाठी लोक कधीकधी वाट्टेल ते करायला तयार होतात. आता हेच बघा ना! तामिळनाडूमधील एका कामगाराने आजारी बायकोसाठी रिमोट कंट्रोल बेड तयार केला आहे.
एका सर्जरीमुळे अंथरूणावर खिळलेल्या पत्नीसाठी ४२ वर्षीय मुत्थूने रिमोट कंट्रोलवरील बेड तयार केला. पत्नीला त्रास होऊ नये म्हणून मुत्थूने रिमोट कंट्रोलवर चालणारा टॉयलेट बेड तयार केला आहे. यासाठी मुत्थूला राष्ट्रीय इनोव्हेशन फाऊंडेशनद्वारे दिले जाणारे बक्षीसही मिळाले आहे. राष्ट्रीय इनोव्हेशन फाऊंडेशनने मुत्थूला दोन लाख रूपयांचे बक्षीस देऊन सन्मान केला. मुत्थू वेल्डिंगचे काम करतात.
मुत्थू म्हणतात की, ‘ मला माहित आहे, आजारपणात रूग्ण पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतो. अशावेळी रूग्णाजवळ असणाराही कंटाळतो. रूग्णाची मानसिक परिस्थिती आणि अडचणी लक्षात घेऊन हा बेड तयार केला आहे. ‘ वेल्डिंगचे काम करणाऱ्या मुत्थूची हे काम पाहून सर्वजण त्याची वाहवा करत आहेत. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने रिमोट कंट्रोल बेडची स्थुती केली आहे. त्यांनी मुत्थूला या बेडच्या ३५० ऑर्डर दिल्या आहेत.