PM Narendra Modi Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज बांदीपूर नॅशनल पार्कसह मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या खास लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता पंतप्रधान मोदी यांचा तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर असतानाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान मोदींचे प्राणीप्रेम दिसून येतं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हो कारण तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी थेप्पाकडू हत्तींच्या छावणीत हत्तींना चारा खायला देतानाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.

मोदींचे प्राणीप्रेम –

हेही वाचा- पुत्र व्हावा ऐसा…! पायलट बनून मुलानं गावचं पांग फेडलं, बापानं थेट हेलिकॉप्टरमधून केली पृष्पवृष्टी

पंतप्रधान मोदींनी आज मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पला भेट दिली. हत्तींच्या छावणीत त्यांनी माहुतांशीही त्यांनी संवाद साधला. या प्रकल्पाची पाहणी करताना मोदींनी तेथील हत्तींना ऊस खाऊ घालतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोदींनी काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी शर्ट, काळे शूज आणि स्लीव्हलेस जॅकेट घातल्याचं दिसत आहे.मोदींचा आजचा अनोखा लुक त्यांच्या समर्थकांना चांगलाच आवड्याचं पाहायला मिळत आहे. कारण अनेकांनी सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या आजच्या लुकचे फोटो शेअर केले आहेत. अनेक दिग्गज भाजपा नेत्यांनीही पंतप्रधानांचे फोटो आपल्या अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यामुळे मोदींचा हा लुक अनेकांना आवडल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर! जंगल सफारीसाठी केलेला खास लुक चर्चेत

कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पालाही भेट –

नरेंद्र मोदींनी आज म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने पंतप्रधान कर्नाटक दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर नॅशनल पार्कसह मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या दौऱ्यादरम्यानचेही अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu pm modi feeds elephant at theppakadu camp video goes viral on social media jap
Show comments