Viral Video : सोशल मीडियावर शाळेतील मुलांचे व शिक्षकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचे दिवस आठवतात तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर शाळेचे आठवणी पु्न्हा ताज्या होतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील चिमुकले गाणं गात डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तामिळनाडू राज्यातील मेलूर पंचायत यूनियन किंडरगार्टन आणि मिडल स्कूल शाळेतील आहे. शाळकरी चिमुकल्यांनी गाणं गाऊन आणि डान्स करून दुहेरी कला दाखवत अनेकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

विद्यार्थ्यांनी केला भन्नाट डान्स, स्वत: गाणं गात लुटला आनंद

हा गोंडस व्हिडीओ तमिळ शाळेतील विद्यार्थ्यांचा आहे. या व्हिडीओमध्ये मुलींचा ग्रुप आणि एक मुलगा डान्स करताना आणि गाणं म्हणताना दिसत आहे. त्यांचा गोड आवाज आणि सुंदर डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला हा व्हिडीओ वारंवार पाहावा वाटेल. शाळेच्या गणवेशात हे चिमुकले अत्यंत आत्मविश्वासाने गाणं गात आहे आणि डान्स करत आहे. एवढंच काय तर ते डान्स करताना आणि गाणं म्हणताना आनंद सुद्धा लुटत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

व्हायरल झालेला व्हिडीओ फक्त गाण्यापुरता मर्यादित नाही. या व्हिडीओमध्ये तुम्हाला या लहान मुलांच्या चेहऱ्यावर खूप जास्त उत्सुकता आणि वेगळा आनंद दिसून येईल.

.future_genius. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही कोणती शाळा आहे? मी लहान होतो, तेव्हा मला शाळेत जॉनी जॉनी येस पप्पा, शिकवायचे” तर एका युजरने लिहिलेय, “शाळेच्या आठवणी नेहमी डोळ्यात पाणी आणतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती निरागस मुले आहे.”

या शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. या विद्यार्थ्यांपैकी एक चिमुकली अतिशय लोकप्रिय आहे. तिचे नाव शिवदर्शनी आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या चिमुकल्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करतात आणि त्यांच्या पोस्टवर मोठ्या संख्येने कमेंट्स आणि लाइक्स करतात.