या आठवड्याच्या सुरुवातीला तमिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात शालेय विद्यार्थीनी चालत्या बसमध्ये दारू पिऊन धिंगाणा करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाळकरी मुली शाळेच्या गणवेशात चक्क बिअर पिताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास केला असून या घटनेला दुजोराही दिला आहे. ही काही खोटी घटना नाही, असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

सर्व मुले सरकारी शाळेतील विद्यार्थी आहेत. सोशल मीडियावर अपलोड केलेली क्लिप एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड केल्याचे समजते. व्हिडीओमध्ये मुले आणि मुली दोघेही बिअरच्या बाटल्या उघडून पितात. सर्व विद्यार्थी चेंगलपट्टू येथील सरकारी शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला जुना व्हिडीओ असल्याचे समजल्यानंतर ही घटना मंगळवारी घडल्याचे समोर आले. थिरुकाझुकुंद्रम ते ठाचूर असा प्रवास करत असताना मंगळवारी ही घटना घडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

आणखी वाचा : नाद करायचा नाय…Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, काय कमालीचं फेकतोय!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तीन चित्त्यांसोबत झोपलेल्या माणसाच्या त्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर…

जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेबाहेर घडलेली घटना व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वाटेत चालत्या बसमधील मुला-मुलींच्या एका गटाने बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि पिण्यास सुरुवात केली. चेंगलपट्टू जिल्हा शिक्षण अधिकारी रोज निर्मला यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. “ही घटना शाळेबाहेर घडली असल्याने पोलीस त्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांचा तपास संपल्यानंतर आम्ही आमच्या स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थिनींवर योग्य ती कारवाई करू.”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

2017 मध्ये, कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना पाणी मागितले असता त्यांना दारू दिली. अहवालानुसार, या विद्यार्थीनी इयत्ता ८, ९ आणि १० वी चे होते आणि त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी दारू पाजली होती, जे मद्यधुंद अवस्थेत होते. तीन आरोपी प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.

Story img Loader