Tamil Nadu school children dance: लहान मुले निरागस असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस असतो; तर काही मुले एखादे काम करण्यासाठी लाजत नाहीत. ती बिनधास्त असतात. सध्या असाच शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून प्रत्येक जण थक्क झाला असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शाळकरी मुलांच्या डान्स व्हिडीओचा धुमाकूळ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, तमिळनाडूतील एका सरकारी शाळेतील मुले थाई गाण्यावर गुणगुणत आणि नाचत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ इतका लोकप्रिय झाला आहे की, तो आतापर्यंत १० कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. खरं तर, गाण्याचे बोल तमीळ भाषेशी खूप मिळत्या-जुळत्या आहेत. म्हणूनच हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेलूर पंचायत युनियन किंडरगार्टन अँड मिडल स्कूल, थेरकमूर येथील एका शिक्षिकेने हा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये मुले ‘Anan Ta Pad Chaye’ या हिट थाई ट्रॅकवर गाणे म्हणत नाचताना दिसत आहेत. गाण्याचे बोल तमीळमध्ये असल्याचे असे व्हिडीओतून ऐकायला येत आहे.

गाण्याचे बोल स्पष्ट ऐकू येत नसले तरीही व्हिडीओमध्ये शाळेतील मुले जोशपूर्ण अंदाजात डान्स सादर करीत असताना दिसत आहेत. डान्स करताना त्यांच्या स्टेप्स, हावभाव, वेळेचे गणित हे सर्वच इतके अचूक आहे की, डान्स पाहणारा प्रत्येक जण थक्क होत आहे.  त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि अजिबात न चुकता केलेल्या डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हा डान्स सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला असल्यामुळे तो अधिक चर्चेचा विषय ठरत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

मुलांच्या या सुंदर सादरीकरणाबद्दल सोशल मीडियावर लोकांमध्ये खूप उत्साह आहे. हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेक जण तो शेअर करीत आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडीओ खरोखरच खूप गोंडस आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “त्यामुळे मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली.” आणखी एकाने लिहिलेय, “मला अभिमान आहे माझ्या शाळेचा.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.