विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे नातं असते. प्रत्येकाजण आपल्या शिक्षकांबरोबरच्या आठवणी जपून ठेवतात. सध्या असाच एक विद्यार्थ्यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तामिळनाडूतील माँटेसरी शाळेतील एका शिक्षिकेने तिच्या वर्गातील मुलांचे हसले चेहरे टिपण्यासाठी अफलातून युक्ती वापरली आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरून हसाल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला एका साध्या पण हृदयस्पर्शी कॅप्शनने होते, “केवळ या गोंडस हास्यांसाठी”. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे, दर्शकांना एका छोट्या पायऱ्यांव बसलेले चिमुकली मुले दिसतात आणि शिक्षक दिसतात. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील नक्कीच मनाला भिडणारे आहे. या व्हिडिओला वेगळे ठरवणारी गोष्ट ही व्हिडीओ शूट करण्याची कल्पक युक्ती आहे. विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे टिपण्यासाठी शिक्षिकांनी हटके पद्धत वापरली आहे.
हेही वाचा – पाकिस्तानी महिलेने वाहतूक पोलिसाच्या थेट अंगावर चढवली कार! धक्कादायक घटनेचा Video Viral
नेहमीसारखे व्हिडीओ शुट करण्या ऐवजी शिक्षकांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की एक शिक्षितका चक्क जमिनीवर झोपून विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शूट करत आहे. एवढंच नाही त्या शिक्षिकेच्या पायाला पकडून दुसरी शिक्षिका तिला ओढताना दिसत आहे. व्हिडीओ शूट करण्यासाठी एवढे कष्ट घेताना पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. नेटकऱ्यांना व्हिडीओ पाहून हसू आवरता येत नाहीये. व्हिडीओ शूट करण्यासाठी उपकरणे नसतील तेव्हा असे जुगाड कामी येतात. पण शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी असे काही करतील याची अपेक्षा कोणीच केली नव्हती.व्हिडीओच्या शेवटी शिक्षिकेने एवढे कष्ट घेऊ शुट केलेला व्हिडीओ दाखवला आहे ज्यामध्ये चिमुकली मुले खळखळून हसताना दिसत आहे”
हेही वाचा – चिमुकल्यावर माकडाचा हल्ला! खांद्यावर चढून थेट….पाहा थरारक Viral Video
काही दिवसांपूर्वी पोस्ट केल्यापासून, व्हिडिओला १९.४ दशलक्ष पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. व्हिडीओवर कमेंट करून अनेकांच्या शिक्षिकेच्या मेहनतीचे कौतूक केले.