दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा असते. या परिक्षेसाठी वर्षभर विद्यार्थी मेहनत करतात, दिवस रात्र अभ्यास करतात. परीक्षा कोणतेही असो प्रत्येक विद्यार्थ्याला भिती वाटते की मी उशीरा परिक्षेला पोहचले तर आपल्याला पेपर देता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी नेहमीच वेळेच्या आधी पोहचण्याचा प्रयत्न करतात. पण गाव -खेड्यातील विद्यार्थी अजूनही बस सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतात त्यांना मात्र नेहमीच वेळेत परिक्षेला पोहचण्यासाठी कसरत करावी लागते. कितीही वेळे आधी निघाले तरी बसने प्रवास करताना उशीर होतो कारण कधी बस उशीरा येते किंवा कधी बस रस्त्यात बंद पडते. अशा प्रत्येक समस्येवर मात करत हे विद्यार्थी कसे बसे परिक्षेला पोहचतात. पण एखादा विद्यार्थी वेळे बस स्टॉपवर येऊन थांबला आहे आणि बसही वेळेवर आली पण स्टॉपवर थांबलीच नाही तर चूक कोणाची? असाच काहीसा प्रकार एका विद्यार्थ्यीनीबरोबर घडला आहे.

तामिळनाडूमध्ये एक विद्यार्थींनी एका बसच्या मागे धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वान्याम्बाडी तामिळनाडू येथील ही मुलगी बारावीमध्ये शिकत असून ती बोर्ड परीक्षा देण्यासाठी निघाली होती. दरम्यान स्टॉपवर बस न थांबल्याने ही तरुणी बसचा पाठलाग करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे आणि अनेकांनी बस चालकाच्या विवेकबुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वानियामबाडीजवळील कोथाकोट्टई येथे बारावीच्या एका विद्यार्थिनीला सरकारी बसने परीक्षेसाठी जात असताना बस चालकाने स्टॉरव बस न थांबवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या गणवेशात असलेली ही मुलगी कोथाकोट्टई बस स्टॉपवर थांबली होती, तेव्हा तिरुपत्तूर-अलंग्याम सरकारी बसने स्टॉपवर न थांबता तशीर भरधाव वेगात पुढे गेली.

काही वृत्तांतांमध्ये असा आरोप आहे की,”विद्यार्थीनी थांबल्याचे लक्षात आल्यानंतरही त्याने तिच्यासाठी बस थांबवली नाही. . परीक्षा चुकेल या भीतीनेजवळपास काही अंतर ही मुलगी बसमागे धावत होती. अखेर काही अंतर धावल्यानंतर बस थांबली आणि विद्यार्थीनी बसमध्ये चढण्यात यशस्वी झाली. दरम्यान हा सर्व प्रकार दुचाकीवरून येणाऱ्या लोकांनी व्हिडिओमध्ये कैद केले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनेकांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे.

सोशल मीडियावर उसळली संतापाची लाट

या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे आणि अनेकांनी बस चालकाच्या विवेकबुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका वापरकर्त्याने उपहासात्मक कमेंट केली: “गुलाबी बस ज्या कारणासाठी थांबत नाहीत तेव्हा त्यांचा काय अर्थ आहे?”

अनेक नेटिझन्सनी वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कथित ‘बेजबाबदारपणा’वर टीका केली आहे, जर चालक त्याच्या स्वत:च्या कुटुंबातील सदस्य असता तर त्यानेही असेच केले असते का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तथापि, काहींनी असे म्हटले आहे की चालक किंवा कंडक्टरने विद्यार्थ्याकडे लक्ष दिले नसेल.

व्हिडिओ ऑनलाइन लोकप्रिय होत असल्याने, न तामिळनाडू वाहतूक विभागावर विशेषतः बोर्डाच्या परीक्षांदरम्या अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्याचा दबाव टाकला जात आहे.