Tamilnadu BJP K Annamalai Crying Video: लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचा मार्ग मोकळा असला तरी भाजपाला उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या अनेक मातब्बरांना यंदा मात मिळाली आहे. अशातच लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ आढळून आला, ज्यामध्ये तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई रडताना दिसत आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा व्हिडीओ काढण्यात आल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या व्हिडीओचा मूळ संबंध हा वृद्धाश्रमाशी असल्याचे आमच्या तपासात लक्षात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X युजर Tapabrata Jana ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की तो अलीकडील आहे.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम मिळवून आमचा तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च सुरू केला. कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला पॉलिमर न्यूजवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

१७ एप्रिल २०२४ रोजी व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. आम्हाला पुथियाथलाईमुराईटीव्हीवर अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला.

दिनमलारच्या यूट्यूब चॅनलवरही हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ महिनाभरापूर्वी प्रसारित झाला होता.

आम्हाला ‘सो साउथ’ वर एक YouTube शॉर्ट सापडला, ज्यामध्ये अण्णामलाई कोईम्बतूरमधील ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करताना भावुक झाल्याचा उल्लेख आहे.

आम्हाला हिंदू तामिळचा अहवालही सापडला.

https://www.hindutamil.in/news/tamilnadu/1232177-annamalai-got-blessing-from-old-age-home-at-coimbatore.html

अण्णामलाई यांनी कोईम्बतूर येथील नाना आणि नानी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांकडून आशीर्वाद घेतल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर ते म्हणाले, “मी तुमच्याकडून मते घेण्यासाठी आलो नाही. मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. इथे दिसलेल्या प्रेमाप्रमाणे, अनेक वडीलधारी मंडळी माझे पाय धुण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबले होते असं म्हणतात अण्णामलाई भावुक झाले होते व त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

हे ही वाचा<< ‘अयोध्येत दिवाळी’, लोकसभा निकालानंतरचा पहिलाच Video म्हणून होतेय चर्चा; भाजपाचा पराभव खरंच असा साजरा झाला का?

अहवाल १७ एप्रिल २०२४ रोजी अपलोड करण्यात आला.

निष्कर्ष: तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अण्णामलाई कोईम्बतूर येथील वृद्धाश्रमात भावुक झाल्याचा जुना व्हिडिओ आता निवडणुकीच्या निकालानंतर अलीकडील व्हिडीओ असल्याचे सांगून शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.