Tandoba andhari tiger attack video: जंगलात मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांमध्ये कायम लपंडाव सुरू असतो. वाघ त्याला सावज दिसले की त्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसतो. तर सावजाला शिकाऱ्याची म्हणजेच वाघाची चाहूल लागली की तो आपल्या सुरक्षा कवचात शिरायचा प्रयत्न करतो. पण कित्येकदा का या लपंडावात वाघाचीच सरशी होते. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या जंगल परिसरात असाच एक थरारक प्रसंग अनुभवायला मिळाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकतंच चंद्रपूरमधूनही अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात एका वाघाने गाईची शिकारी केली. वाघाची शिकार हा नेहमी उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. फार कमी लोकांना ती याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना वाघाची शिकार अगदी डोळ्यासमोर पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. पर्यटकांसमोर वाघाने अतिशय शांततेमध्ये योग्य नेम साधत गायीची शिकार केली. या शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेकांनी सुट्टीच्या निमित्ताने ताबोडाची सफर बुक केली आहे. ताडोबामध्ये वाघ पाहणे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यानं गाय चालत आहे. याची वाघाला चाहूल लागते आणि वाघ थेट रस्त्यावर येत गायीचा पाठलाग करायला सुरुवात करतो. अगदी हळू हळू तो गायीच्या मागून पळत पळत जातो आणि गायीवर हमला करतो. अत्यंत चपळाईने वाघाने गाईला जखमी करत शिकार साधल्याचे व्हिडीओत दिसत आहे. रस्त्याच्या अगदी कडेला झालेल्या या थराराने ताडोबाकडे निघाले पर्यटक क्षणभर थबकलेच. मात्र विशेष म्हणजे वाघाच्या ताकदीसमोरही गायईनं स्वत:ला शेवटपर्यंत टिकवून ठेवल्याचं दिसत आहे. पण शेवटी वाघ गाईला जंगलात फरफटत घेऊन गेला. हा थरार लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून त्याची चर्चाही होत आहे. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं.
/
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “बापरे काय चोर आहे” चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून अवाक् व्हाल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ royal_bhatka नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर अनेक लोक कमेंट्स सुद्धा करत आहेत. दरम्यान या परिसरात वाघ, बिबट्यांकडून शेळी, पाळीव प्राण्यांवर अशा प्रकारचे हल्ले सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे