सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत वेगवेगळ्या रेसिपी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. एखादा पदार्थ वेगळ्या पद्धतीने तयार करून त्या पदार्थाबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. अशाच एका पदार्थाने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मॅगी करताना त्याच्यासोबत वेगवेगळे प्रयोग करणं आता नित्याचंच झालं आहे. आता तंदूरी मॅगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना मॅगीचा डान्स खूपच भावला आहे. व्हायरल व्हिडिओखाली अनेकांनी मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओत तंदूरी मॅगीची रेसिपी दिसत आहे. दोन मिनिटात तयारी होणारी मॅगीची रेसिपी त्याच्या पॅकेटवर लिहिली असते. मात्र वेगवेगळ्या रेसिपी पाहून नेटकरी चक्रावून गेले आहेत. पहिल्यांदा कुल्हड गर्म करण्यासठी कोळशाच्या भट्टीत टाकला जातो. त्यानंतर कुल्हड तापल्यानंतर ते बाहेर काढून बटर टाकलं जातं. बटर टाकता क्षणी कुल्हडमधून आगीचा ज्वाला निघतात. लगेचच त्यात मॅगी टाकली जाते. मॅगी कुल्हडमध्ये गेल्यानंतर डान्स करू लागते. हे दृश्य नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

तंदूरी मॅगीचा व्हिडिओ यूट्युबवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, मॅगीच्या आत्म्याला शांती मिळो. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, भूक भागवण्याऱ्या मॅगीसोबत असे खेळ नको.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tandoori maggie receipe viral on social media rmt