माणसांचं रक्तदान शिबीर होतं हे आपल्याला ठाऊक आहे. रक्तदान महादान असंही म्हटलं जातं. चेन्नईत मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे कुत्र्यांचं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या रक्तदान शिबिरात ५० कुत्र्यांचा सहभाग होता. प्राण्यांना रक्ताची अवस्था भासली तर त्यासाठी एक ब्लड बँक असावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. या रक्तदान शिबिरात गोळा केलेलं रक्त तनुवास रक्तपेढीमध्ये साठवलं जाणार आहे. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत आणि त्यांना काही इजा झाली किंवा रक्ताची आवश्यकता भासली तर ते या रक्ताचा वापर करू शकणार आहे. या रक्तदान शिबीरात ५० कुत्र्यांनी सहभाग घेतला होता यापैकी ११ कुत्र्यांनी रक्तदान केलं. रक्तदान केलेल्या कुत्र्यांना डोनर कार्डही देण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in