उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. दररोज व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्यांच्या काही पोस्ट प्रेरणा देणाऱ्या, तर काही पोस्टमधून ते कानउघडणी करताना दिसतात. त्यांचा जबरदस्त अंदाज नेटकऱ्यांना भावतो. त्यामुळे त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांनी एखादी पोस्ट टाकली की, त्यावर लाखोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. आता आनंद महिंद्रा यांनी व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये टांझानियातील बहिण-भाऊ बॉडिवूड गाणं गाताना दिसत आहे. तसेच त्यांचे जबरदस्त एक्स्प्रेशन त्यांना भावले आहेत. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनही लिहिली आहे.

‘रातां लंबियां…’ या बॉलिवूड गाण्याचे बोल गात बहीण भाऊ नाचत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Kili Paul नावाच्या युजर्सने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल त्यांची बहीण नेहमीप्रमाणेच त्याच्या पारंपरिक मसाई ड्रेसमध्ये दिसून आले आहेत. हा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांना आवडला. “मी बँडबाज्यावर उड्या मारत आहे. त्यांच्या वाढत्या फॅन क्लबमध्ये सहभागी होत आहे. त्यांचे एक्स्प्रेशनने माझा उत्साह वाढला आहे.”, असं कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिली आहे.

या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच कमेंट्स करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Story img Loader