टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत. टांझानियाच्या किली पॉल आणि नीमा या बहिण भावाची जो़डी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. बॉलीवूडच्या गाण्यांवर नाचणारी ही भावंडांची जोडी इंटरनेटवर सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. हे दोघेही हिंदी गाण्यांवर लिप सिंक डान्स करतात आणि लोकांना त्यांचा परफॉर्मन्स इतका आवडतो की ते त्यांच्या व्हिडीओची अक्षरशः वाट पाहत असतात. याच मालिकेत आणखी भर घालत भावाने आता थेट बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला जबरदस्त टक्कर दिलीय. नुकतंच या टांझानियन तरूणाचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये भाऊ किली पॉलने इतका जबरदस्त डान्स केलाय की त्यापूढे मूळ गाण्यातली अभिनेत्री नोरा फतेही सुद्धा फिकी पडली आहे. तुम्हाला विश्वास होणार नाही, त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये टांझानियाचा तरूण किली पॉल हा अभिनेत्री नोरा फतेही हिच्या ‘डान्स मेरी रानी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरील kili_paul नावाच्या अकाउंटवरून शेअर केलाय. सोशल मीडियाचे यूझर्स सध्या त्यांच्या तुफ्फान प्रेमात पडलेत. फक्त सोशल मीडियावरीव युजर्सच नव्हे तर स्वतः अभिनेत्री नोरा फतेही या टांझानियन तरूणाच्या डान्सची फॅन बनली आहे. इतकंच नव्हे तर हे गाणं गायलेल्या गुरु रंधवानेच आता त्याचा हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना गुरूने लिहिलं की, “हे गाणं खरोखरंच आफ्रिकेत दाखल झालं.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : इवल्याश्या बदकानं शिकारीसाठी पाण्यात उतरलेल्या वाघाला चक्रावून सोडलं! पहा कसं ते…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एक वर्षांनी मालकाला भेटल्यानंतर हत्तीने मिठी मारली! मोठ्या स्वॅगमध्ये केलं स्वागत, पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने सुद्धा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल हुबेहूब गाण्यातल्या नोरा फतेहीचे डान्स स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही लक्षात आले असेल की सोशल मीडियात बॉलीवूडची किती क्रेझ आहे. तो नोराची हुबेहूब कॉपी करत आहे. यावरही लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. किलीचा परफॉर्मन्स पाहून सारेच जण थक्क झाले आहेत आणि सगळेच त्याचं कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : कागदी विमानाप्रमाणे टीनचे छप्पर उडून कारवर कोसळले, ऑस्ट्रेलियामधल्या वादळाचा VIDEO VIRAL

या आफ्रिकी तरूणाची लोकप्रियता एवढ्या वेगाने वाढत आहे की, व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच १ लाख ३७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या आफ्रिकी तरूणाच्या डान्सपुढे मूळ गाण्यातल्या नोरा फतेहीचा डान्स फेल ठरलाय, अशा भावना युजर्स या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये व्यक्त करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanzanian boy kili paul impresses nora fatehi with his dance moves to dance meri rani watch viral video prp