Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळेच्या आठवणी नेहमी मनाच्या कोपऱ्यात जीवंत असतात. शाळेचे शिक्षक असो किंवा मित्र मैत्रीणी कायम स्मरणात राहतात. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा शाळेची आठवण येते. शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांना मनसोक्त डान्स शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांचे शाळेचे दिवस आठवतील.

हा व्हायरल व्हिडीओ एका वर्गखोलीतील आहे. या व्हिडीओत तु्म्हाला अनेक विद्यार्थी दिसेल. शाळेचे विद्यार्थी गणवेशात दिसत आहे आणि त्यांच्या बाकावर उभे आहेत. त्यांच्या समोर उभे असलेले गुरुजी त्यांना डान्स शिकवताना दिसत आहे. ते विद्यार्थ्यांना सोपी सोपी डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे. विद्यार्थी या गुरुजींचे अनुकरण करताना दिसत आहे आणि गुरुजींचा डान्स पाहून ते सुद्धा हुबेहूब डान्स करताना दिसतात. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या गुरुजींचा डान्स पाहून काही लोकांना तारे जमीन पर या लोकप्रिय चित्रपटाली आमिर खानची भूमिका आठवेल तर काहींना त्यांच्या शाळेतील शिक्षकांची आठवण येईल.

amitthakursidhu या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ये लगी नाटी ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “ही शाळा कुठे आहे आणि इतके प्रेमळ शिक्षक कुठे आहे” तर एका युजरने लिहिलेय,”तुम्ही खूप क्युट आहात सर. मुलांबरोबर तुम्ही सुद्धा लहान होतात. नेहमी असेच आनंदी राहा सर” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान सर” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काहींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader