Tata Punch became number 1 car: टाटा पंच २०२४ मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच, मारुती सुझुकीचे मॉडेल चार्टमध्ये अव्वल राहिलेले नाही. मारुती सुझुकीच्या वॅगनआरला मागे टाकत टाटा मोटर्सने पंचच्या २,०२, ०३० युनिट्सची विक्री केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकी वॅगनआरच्या १,९०,८५५ युनिट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. तर एर्टिगा १,९०,०९१ युनिट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. तसंच ब्रेझा आणि ह्युंदाई क्रेटा अनुक्रमे १,८८,१६० आणि १,८६,९१९ युनिट्ससह पहिल्या पाचमध्ये आहेत.

भारताच्या प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत विक्रीत लक्षणीय वाढ झाली, २०१८ मध्ये ३३.४९ लाख युनिट्सवरून २०२४ मध्ये ४२.८६ लाख युनिट्सपर्यंत वाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे २०२४ मधील टॉप पाच बेस्ट-सेलरपैकी तीन एसयूव्ही होत्या, जे या विभागासाठी देशाची वाढती मागणी अधोरेखित करतात.

हेही वाचा… HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत

टाटा पंचला त्याच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही, सेफ्टी फीचर्स आणि विविध पॉवर ट्रेन पर्यायांसह या ट्रेंडचा यशस्वीपणे फायदा झाला आहे. हे मॉडेल टाटा मोटर्ससाठी का यशस्वी ठरले आहे ते जाणून घेऊ…

टाटा पंच सगळ्यांपेक्षा वेगळी कशी?

टाटा पंचच्या यशाचं कारण त्याची अफॉर्डिबिलिटी (परवडण्यासारखं असणं), सेफ्टी फीचर्सची यादी आणि अनेक पॉवर ट्रेन पर्याय यांसारखे विविध फीचर्स आहेत. काही ठळक फीचर्समध्ये हाय ग्राउंड क्लीयरन्स (high ground clearance) आणि कमांडिंग ड्रायव्हिंग पोझिशन (commanding driving position) समाविष्ट आहे. त्याची कॉम्पॅक्ट साईज शहरातील ट्रॅफिकमध्ये सहज पुढे जाण्यास मदत करते, तर स्पर्धात्मक किंमत आणि चांगली इंधन कार्यक्षमता यांमुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं दिसून येतं. आधुनिक डिझाइन आणि मजबूत सेफ्टी फीचर्ससह ही कार तरुण खरेदीदार आणि कुटुंबांना आकर्षित करते.

हेही वाचा… दिशा पाटनीने विकत घेतली नवीन रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, किंमत ऐकून व्हाल अवाक

सुरक्षेच्या बाबतीत टाटा पंचमध्ये ड्युअल एयरबॅग्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, ABSसह EBD, आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅमसह अनेक सक्रिय आणि निष्क्रिय सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे या मॉडेलला उच्च सुरक्षा रेटिंग्स (high safety ratings) मिळाल्या आहेत, ज्यात ग्लोबल NCAP कडून प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५ स्टार्स आणि मुलांच्या सुरक्षेसाठी ४ स्टार्स मिळाले आहेत. भारत NCAP मानकांनुसार, पंच EV ने सर्व टाटा वाहनांच्या तुलनेत सर्वोच्च सुरक्षा रेटिंग्स मिळवले आहेत.

पंचमध्ये १.२L रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन आहे, जे ८७.८ PS पॉवर आणि ११५ Nm टॉर्क देते. या मॉडेलमध्ये पेट्रोल-ओन्ली, पेट्रोल-CNG आणि प्युअर EV व्हेरिएंट्स आहेत, ज्यात विविध ट्रान्स्मिशन पर्याय उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata punch tops sales 2024 indias number 1 car not maruti suzuki google trends dvr