आजपर्यंत आपण केवळ माणसांसाठी नवनवीन हॉस्पिटल उभारले जाणार असल्याची घोषणा ऐकत आलो आहोत. मात्र, आता भारतामध्ये सर्वात पहिले ‘पाळीव प्राण्यांची’ काळजी घेण्यासाठी खास पशु हॉस्पिटल उभारले जाणार असल्याची घोषणा टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी केलेली आहे. या हॉस्पिटलमध्ये प्राण्यांची सर्वोत्तम काळजी घेण्यासाठी जागतिक स्तरावरील अतिशय निष्णात पशुवैद्य, नर्स तैनात असणार आहेत.

पाळीव प्राण्यांसाठी बांधण्यात येणारे हे खास हॉस्पिटल मुंबईमधील महालक्ष्मी या भागात उभारण्यात येणार आहे. मात्र, हे हॉस्पिटल लाँच कधी होणार, तसेच यामध्ये प्राण्यांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या प्रगत उपकरणांचा वापर केला जाईल ते जाणून घ्या.

season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Law Student Theft Case
Law Student Theft Case : गर्लफ्रेंडचा शॉपिंग आणि आयफोनचा हट्ट पूर्ण करण्यासाठी कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी करायचा चोरी; ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
MHADAs Mumbai Board of Housing applications deadline extended by 12 hours
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांचे अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज भरण्यासाठीची मुदत १२ तासांनी वाढवली
sahyadri sankalp society work for growth and conservation of ratnagiri forests
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन
Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र

१. प्राण्यांच्या हॉस्पिटलचे बांधकाम

मुंबईमधील महालक्ष्मी या भागामध्ये टाटा ट्रस्टचे पाच मजली भव्य पशु हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. एकूण पाच माळ्यांच्या या हॉस्पिटलमध्ये तब्बल २०० खाटांची क्षमता असेल. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या ९८,००० चौरस फूट क्षेत्रफळात याचे बांधकाम होणार आहे. रतन टाटा यांच्या या खास पाळीव प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम पशुवैद्यक, नर्स आणि त्यांचा जीव वाचवू शकणारे विविध दर्जेदार मशीन आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ चोवीस तास सेवा प्रदान करतील.

हेही वाचा : Video : तोंडात लाकडी फळी त्यावर दोन ग्लास अन् एक डोक्यावर; श्वानाचे हे अफलातून कौशल्य पाहा

२. प्राण्यांच्या हॉस्पिटलचे उदघाटन

खास प्राण्यासाठी बांधण्यात आलेले पाच मजली हॉस्पिटल हे मार्च २०२४ मध्ये उघडणार आहे. “घरात पाळलेले प्राणी म्हणजे कुटुंबाचा एक भाग असतात. त्यांचे आरोग्य आणि त्यांचा जीव प्रत्येक प्राण्याच्या मालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, मी जेव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा मला असे समजते की, भारतामध्ये प्राण्यांची संख्या अधिक असूनदेखील त्यांच्या मूलभूत सुविधांबद्दल भारतात प्रचंड कमतरता असल्याचे मला जाणवले. मात्र या मुक्या प्राण्यांसाठी तयार होणाऱ्या लहानश्या हॉस्पिटलचा या मुक जीवांची काळजी घेणे, त्यांना प्रेम देणे आणि त्यांचे आरोग्य जपणे हा हेतू आहे”, असे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी हॉस्पिटलच्या लाँच बद्दल बोलताना सांगितले.

“भारतात निर्माण होणारे हे हॉस्पिटल प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी वचनबद्ध आहे. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये पाळीव प्राण्यांसाठी प्रगत आरोग्य सेवा, योग्य निदान, उत्तम उपचाराच्या सुविधा असतील. त्यांची काळजी घेण्यासाठी उच्चस्तरीय नर्सिंग आणि प्राण्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व आवश्यक सोई दिल्या जातील. इतकेच नाही, तर येत्या काही महिन्यांमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च रेटिंग असलेल्या पशुवैद्यकीय संस्थेला, म्हणजेच लंडनमधील रॉयल व्हेटर्नरी कॉलेजसह मिळून एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार करत आहोत”, असे प्रगत पशुवैद्यकीय सेवा सुविधेमधील मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर थॉमस हेथकोट [Chief Veterinary Officer, Advanced Veterinary Care Facility (ACVF) ] म्हणतात.

हेही वाचा : पाळीव कुत्र्याने केला चक्क ३ लाखांचा नाश्ता!! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहा…

३. प्राण्यांच्या हॉस्पिटलमधील यंत्रणा

टप्प्याटप्प्याने तयार होणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा असतील ते पाहू.

आपत्कालीन आणि क्रिटिकल केअर – २४x७ ट्रायज आणि उपचार सेवा, इनपेशंट आणि आयसीयू युनिट्स (आयसोलेशन युनिट्ससह), सॉफ्ट टिश्यू सर्जरी, ऑर्थोपेडिक्स इ.सर्जिकल सेवा, फार्मसी सेवा उपलब्ध असतील.

इतकेच नव्हे, तर सपोर्ट फंक्शन्स जसे की डायग्नोस्टिक्स – रेडिओलॉजी आणि इमेजिंग (एमआरआय, एक्स-रे, सीटी स्कॅन आणि यूएसजी), प्रयोगशाळा – हेमेटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सायटोलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, हिस्टो-पॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशिया यांचाही या हॉस्पिटलमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

टाटा ग्रुपची नीतिमूल्ये जपणारी तज्ज्ञांची ही टीम, मुंबईत तयार होणारे हे प्राण्यांचे हॉस्पिटल मुक्या जीवांची काळजी घेण्याचा दर्जा नक्कीच उंचावणार आहेत. तसेच यामधील प्राण्यांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर थॉमस हेथकोट यांच्या हाताखाली कुशल डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ यांसारख्या ६६ जणांची मजबूत टीम असणार आहे.