Shocking video: ट्रॅफिक पोलिसांचे अने किस्से आपण ऐकले आहे. सोशल मीडियावरदेखील अनेक नागरिकांनी शेअर देखील केले आहेत. चुकीच्या गोष्टींवर लगाम घालणं आणि शिक्षा करण्याचं काम खाकीचं असतं मात्र पैशांच्या मोहापाई जेव्हा पोलीसच भ्रष्टाचार करायला लागतात तेव्हा मोठा गदारोळ निर्माण होतो. सर्वसामान्य व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु अनेक बडे म्हटले जाणारे व्यक्ती ओळखीमुळे सुटतात. अनेकदा वाहतूक पोलीस तडजोड करत असतात. दंड न आकारता रोख रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडून देतात. या पद्धतीने लाच घेणारे महाभाग असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच एका टॅक्सी ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या टॅक्सी ड्रायव्हरचं टोल नाक्यावरील एक पोलीस कर्मचाऱ्यासोबत भांडण झालं. या ड्रायव्हरनं केलेल्या आरोपानुसार, पोलिसानं त्याच्याकडे लाच मागितली. टोल भरल्यानंतरही तो अधिकचे पैसे मागत होता. पणे हे पैसे तो का घेतोय हे मात्र त्यानं सांगितलं नाही. परिणामी ड्रायव्हर भडकला आणि पोलिसासोबत वाद घालू लागला.

नेमकं काय घडलं?

ही घटना झारखंडमधील डुमरी टोल प्लाझावर घडल्याचं समोर आलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका टॅक्सी ड्रायव्हरचा पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद सुरू आहे. गाडीच्या बाहेर उभं राहून एक पोलीस तरुणाशी बोलत आहे, यावेळी त्यांनी अतिरिक्त पैशाची मागणी केली. सुरूवातीला पोलिसानं त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण ड्रायव्हर देखील हुशार निघाला त्यानं पोलिसाची दादागीरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. दरम्यान पोलिसानं त्याचा मोबाईलही हिसकावण्याचा प्रयत्न केला खरा. पण गाडीमध्ये कॅमेरे लावले होते त्यामुळे मोबाईल हिसकावून काहीच फायदा होणार नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. मग तो केवळ शब्दांचे बाण सोडून ड्रायव्हरला धमकावत होता. पण ड्रायव्हर जराही घाबरला नाही. उलट, “मला हलक्यात घेऊ नकोस तुझी नोकरी खाऊन टाकेल अशी उलट धमकी त्यानं पोलिसाला दिली.”

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Ghar Ke Kalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलं, “या ड्रायव्हरने अतिशय योग्य केलं आहे. ” तर आणखी एकानं “कायद्याचे रक्षकच हल्ली भक्षक होत चालले आहेत” अशी प्रतिक्रिया दिली आहे.