ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसपेक्षा एअर कंडिशनिंगची ओला, उबर, एसी ट्रेन किंवा बस या उन्हात प्रत्येक नागरिकासाठी सोईस्कर ठरते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या उष्णतेपासून प्रत्येकाला ही एसी, थंड हवा गरजेची असते. पण, काही वेळा ओला, उबर चालक एसी चालू करण्यास टाळाटाळ करतात. कारण- त्यांचे मायलेज कमी होईल आणि इंधनाचा खर्च वाढेल. ही बाब लक्षात घेता, एका चालकाने आपल्या प्रवाशांना एक सरळ नोटीसच दिली आहे. तसेच या नोटिशीमध्ये दिलेली सूचना फॉलो करायची नसल्यास ग्राहकांसाठी एसीसाठी थेट पाच रुपये जास्तीचे भरा, असा आग्रह करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्या ​​टंडन नावाची युजर @divya_gandotra प्रवासासाठी कॅब बुक करते. कॅब तिच्या घटनास्थळी पोहोचते. कॅबमध्ये प्रवेश करताच तिला एक नोटीस लावलेली दिसते. त्यामध्ये जर ग्राहकांना एसी लावायची असेल, तर त्यासाठी काही सूचना आणि कॅबचालकाच्या काही समस्या या नोटिशीमध्ये मांडलेल्या दिसत आहेत. हे पाहून या युजरने या नोटीसचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर तो शेअर केला. नक्की काय लिहिलं आहे या नोटीसमध्ये व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…अशक्य ते शक्य प्रवास! दीपा कर्माकरने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय जिम्नॅस्ट

पोस्ट नक्की बघा…

या नोटीसमध्ये असं लिहिलं आहे की, ‘प्रिय ओला उबर ग्राहकांनो, एसीची मागणी करून तुम्ही आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नका. अगोदरच कंपनीने ३० ते ४० टक्के कमिशन घेऊन आमचे कंबरडे मोडले आहे. जोपर्यंत कंपनी आमच्यासाठी वाजवी दर ठरवीत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल, अशी आम्हाला आशा आहे. तसेच जर तुम्हाला एसीची गरज असल्यास कृपया पाच रुपये प्रति किलोमीटर अतिरिक्त पैसे द्या’, अशी विनंती वा सूचना कॅबचालकाने स्वत:च्या सीटमागे एका कागदार हिंदी भाषेत लावलेली दिसते आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @divya_gandotra या एक्स (ट्विट) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, “मला त्यांच्या मागण्यांवर भाष्य करायचे नाही. पण, कंपनीच्या भांडणाची शिक्षा ग्राहकांना एसी न देऊन करणं योग्य नाही. तसेच तुम्ही एसी चालू करता तेव्हा मायलेजमध्ये फारसा फरक नसतो.” दुसऱ्या युजरने लिहिले, “इमोशनल ब्लॅकमेल करण्याची ही पद्धत थोडी आनंददायी आहे.” आदी अनेक कमेंट्स पोस्टखाली पाहायला मिळत आहेत; ज्या विचार करायला नक्कीच भाग पाडतील.