सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो, तर काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात, जे पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल यात शंका नाही.
हो कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मुलाने आपल्या वहित अशी काही बाराखडी लिहीली आहे. जी पाहून शिक्षकांसह नेटकरीही थक्क झाले आहे. खरं तर लहान मुलं अनेकदा शिक्षक किंवा पालक ज्या पद्धतीने शिकवतात त्याच पद्धतीने अभ्यास करत असतात. त्यांना एखादी गोष्ट आपण ज्या पद्धतीने सांगू ते ती तशीच फॉलो करतात. मग ती चूक की बरोबर त्यांना कळत नसतं. त्यामुळे अनेकदा लहान मुलांकडून अजानतेपणी काही चुका होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मुलाने गृहपाठात अशाच चुका केल्याचं पाहायला मिळत आहे.
शिक्षकांनी मुलाला हिंदीमध्ये क, ख, ग ची बाराखडी लिहायला सांगितली आहे. शिवाय शिक्षकांनी त्याला क म्हणजे कबुतर हे लिहून दिलं होतं. पण त्या मुलाने पुढे ख, थ या अक्षरांसाठी जे काय लिहिलं आहे. ते पाहून तुम्हीही डोकंच धराल यात शंका नाही. कारण या मुलाने संपूर्ण बाराखडी कबुतर शब्दाबरोबर जोडली आहे. क ला कबुतर तर ख ला कबुतर आणि चला चबुतर असं थ पर्यंत त्यांने लिहिलं आहे. एवढेच नव्हे तर शिक्षकांनी या मुलाचा गृहपाठ तपासताना लाल पेनाने सर्व चूक असा शेरा दिला आहे.
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे चांगलच मनोरंजन होत आहे. i_am_naval_kishor_kushwah नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, तो कबुतराच्या मागेच लागला आहे. तर आणखी एकाने लिहिलं आहे की, मुलामध्ये खूप टॅलेंट आहे पण त्याचं समर्थन करण्यासाठी कोणीही नाही. अशा अनेक मजेदार कमेंट्स या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.