Teacher Beat Student Viral Video : शिक्षकाला गुरु म्हटले जाते, जो विद्यार्थ्यांना समजून घेत शिकवतो, त्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे भारतात शिक्षक अर्थात गुरुंना मानाचे स्थान आहे. मात्र हल्ली हे शिक्षकच विद्यार्थ्यांचे वैरी असल्याप्रमाणे वागताना दिसत आहेत. कारण हल्ली शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे, सध्या अशाच एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की, नक्की हे कोचिंग सेंटर आहे की टॉर्चर सेंटर?. कारण या व्हिडीओमध्ये एक प्रायव्हेट कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना बेदम मारताना दिसतोय. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही मुलांना कोचिंग क्लासेसला पाठवण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडिओ व्हिडीओत पाहू शकत की, एक कोचिंग सेंटर आहे, जिथे एका रांगेत अनेक विद्यार्थी भिंतीला टेकून उभे तर मधेच हातात काठी घेऊन एक शिक्षक दिसत आहे. जो त्याच्या समोर येऊन उभा असलेल्या एकएका विद्यार्थ्याला काठीने झोडपून काढतोय. आधी तो त्या काठीने एका विद्यार्थ्याला मारहाण करतो.

त्यानंतर तो दुसऱ्या विद्यार्थ्याला मारतो. त्यानंतर तो कोचिंगच्या गेटवर जातो आणि तिथे प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या काठीने मारु लागतो. एखाद्या चोराला पकडून मारावा त्या प्रकारे हा शिक्षक विद्यार्थ्यांना मारतोय.काठीचा फटका बसताच विद्यार्थी अंग चोळत जाऊन उभे राहतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

हेही वाचा – ट्रेनमधून पार्सल पाठवताय? मग हा Viral Video एकदा पाहा; तुम्हालाही बसेल धक्का

u

u

दरम्यान हा व्हिडिओ तामिळनाडूमधील तिरुनेलवेली येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षकाची मारण्याची ही पद्धत पाहून लोक या कोचिंग सेंटरला टॉर्चर सेंटर म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आणि मग तेच विचारतात की शिक्षकांना का मारहाण केली जाते.’

दुसऱ्या युजरने लिहिले की, कोचिंगमध्ये शिकले कुठे जातेय, फक्त गुंडागर्दी सुरू आहे, पैशासाठी व्हिडीओ बनवले जात आहेत आणि सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत, ही फक्त पैशासाठीची लढाई आहे, आणखी एका युजरने लिहिले की, ‘आता शाळा असो की कोचिंग, सगळीकडे मारामारीस, भांडणं होत आहे.