Teacher Dance Viral Video : ‘पतली कमरीया मोरे हाय हाय’ या भोजपुरी गाण्याच्या एका व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हिंदी गाण्यावर थिरकणाऱ्या अनेकांना तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल, पण या भोजपुरी गाण्यावर एका शिक्षकाने शाळेतील वर्गात भन्नाट डान्स केला आहे. शिक्षकाचे दिलखेचक ठुमके पाहून वर्गातील सर्व विद्यार्थी या गाण्यावर थिरकताना व्हिडीओत दिसत आहेत. या गाण्यावार शिक्षकाने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गाण्यावर थिरकण्याच्या या कृत्याला काही जणांनी मुर्खपणाचं लक्षण म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अन् शिक्षकासोबत विद्यार्थीही पतली कमरीया गाण्यावर थिरकले

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ @stormiismykid नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. “माझा देश बदलत आहे, पुढं चालला आहे.” असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याने ४५ हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अशा प्रकारची वागणूक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध खराब करू शकते, असं काही जणांनी म्हटलं आहे. तर एका ट्विटर युजरने म्हटलं, “या गोष्टींमुळेच शिक्षणाचा दर्जा ढासळत आहे.” अन्य एक नेटकरी म्हणाला, हा बेजबाबदारपणा आहे.” “हे अजिबातच मजेशीर नाहीय,” असंही एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं. “हे असंच आताचं शिक्षण आहे का?”, अशी प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी व्हिडीओ बनवणाऱ्याला चांगलच धारेवर धरलं.

इथे पाहा व्हिडीओ

रस्त्यावरून दुचाकी चालवताना एका तरुणीने सीटवर उभं राहून ‘पतली कमरीया मोरे’ याच भोजपुरी गाण्यावर डान्स केला होता. बाईकवर स्टंटबाजी करून भन्नाट डान्स करण्याचा प्रयत्न एका तरुणीने केला होता. तसंच रस्त्यावरून येणाऱ्या दुचाकीस्वारांनीही डान्स करण्याचा आनंद लुटला होता. तरुणीनं खूप मोठा धोका पत्कारून बाईकवर डान्स केला आणि व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. एका नेटकऱ्याने म्हटलं, अप्रतिम, “तू खूप मस्त डान्स करत आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला होता, हा मुर्खपणा आहे आणि धोक्याची सवारी आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher crazy dance in front of students in school classroom patli kamariya mori song video viral netizens angry reaction nss