Teacher Dance Viral Video: इंटरनेटवर रोज कोणते ना कोणते भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. रस्त्यावरून येजा करताना स्टंटबाजी करणारी मुलं व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. भर लग्नमंडपात नवरा-नवरी थिरकतानाचे व्हिडीओही व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. हल्ली तर शाळेतील शिक्षिकाही विद्यार्थ्यांसोबत फावळ्या वेळात मजेशीर डान्स करताना दिसतात. असाच एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर वर्गातच शाळेतील शिक्षिका विद्यार्थ्यासोबत थिरकताना या व्हिडीओत दिसत आहे. शिक्षिकेनं जबरदस्त ठुमके लगावत वर्गात असलेस्या सर्व विद्यार्थ्यांचं मनोरंजन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षिकेचे भन्नाट ठुमके पाहून लोटपोट हसाल

हा भन्नाट व्हिडीओ @McclainEducates नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून व्हिडीओला नेटकरी शेअरही करत आहेत. शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत केलेला डान्सचा व्हिडीओ जबरदस्त असल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. मजेशीर व्हिडीओनं नेटकऱ्यांचंही मनोरंजन केलं असून तुम्हीही व्हिडीओ पाहिल्यानंतर लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत.

नक्की वाचा – Video : भर रस्त्यात तुंबळ हाणामारी, तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् तितक्यात….

इथे पाहा व्हिडीओ

शिक्षिकेच्या भन्नाट डान्सच्या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून मजेशीर प्रतिक्रियाही या व्हिडीओला मिळत आहेत. हा व्हिडीओ फ्लोरीडाच्या एका शाळेतील असून विद्यार्थी आणि शिक्षिकेमध्ये एक प्रकारे डान्सची स्पर्धाच रंगली असल्याचं दिसत आहे. शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत जबरदस्त ठुमके मारल्याचे पाहून तुम्ही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत. शाळेतील वर्गात विद्यार्थी आणि शिक्षिका एकत्रितपणे मस्ती करण्याच्या मूडमध्ये उभ्या असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. शिक्षिकेसमोर एक विद्यार्थी डान्स करायला सुरुवात करतो. त्यानंतर शिक्षिकाही त्याच्यासोबत थिरकते आणि भन्नाट ठुमके लगावत त्याला डान्स करण्याचं एकप्रकारे आव्हानच देते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher crazy dance moves in front of students in school classroom twitter video goes viral on internet netizens funny reaction nss