शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं गुरु-शिष्याप्रमाणे असतं. शिक्षकाकडून मिळालेली विद्येची शिदोरी आयुष्यभर जोपासणं हे खरंतर विद्यार्थ्याचं काम. विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी खूप जास्त आदर असतो. आई-वडिलांनंतर जर आपण कोणाचं ऐकतो तर ते शिक्षक असतात. पण, जर शिक्षकानेच मर्यादा ओलांडल्या तर… , कारण या कलियुगात कधी काय घडेल ते सांगता येत नाही.

सोशल मीडियावर दररोज शाळेतील शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. आजकाल शाळेतील अभ्यास सोडून विद्यार्थी शाळेच्या गणवेशात कुठेही थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ याचं उत्तम उदाहरण आहे.

विद्यार्थीनीच्या डान्सला शिक्षकांची साथ

शाळेतील शिक्षकाचा आणि विद्यार्थिनीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिनी जमलेले दिसतायत. ‘स्त्री-२’ चित्रपटातील “आज की रात मजा हुस्न का…” या गाण्यावर एक विद्यार्थिनी डान्स करताना दिसतेय. रस्त्याच्या कडेला शाळेच्या गणवेशात ही विद्यार्थिनी अश्लील डान्स करताना दिसतेय. बरं, या सगळ्यात एक शिक्षकदेखील तिला प्रोत्साहन देताना दिसतोय. विद्यार्थिनी डान्स करत असताना शिक्षदेखील तिथे डान्स करू लागले आणि तिला साथ देऊ लागले.

व्हिडीओ व्हायरल होताच हा सगळा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ajirul2252 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/DGMqbfUz9Ed

व्हिडीओ व्हायरल होताच हा सगळा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ajirul2252 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

विद्यार्थिनीचा आणि शिक्षकाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “शिक्षणाचा आणि शिक्षकांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललाय.” तर दुसऱ्याने “तुम्हाला लाज कशी वाटत नाही” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “असे शिक्षक असतील तर ते काय विद्यार्थ्यांना शिस्त लावणार.” तर एकाने कमेंट करत लिहिलं, “लाज कशी वाटली नाही?”

Story img Loader