सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक जण विपरीत गोष्टी करण्याची शक्कल लढवतात. आपण कुठे आहोत? काय करतोय? याचं भानंच अशा माणसांना राहिलेलं नसतं. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी मर्यादा ओलांडून व्हिडीओ काढणे अनेकांच्या अंगलटही आल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलंय. सोशल मीडियावर अशाच एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सने या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. एका महिला शिक्षिकेनं चक्क शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्यांसोबत भोजपूरी गाण्यावर डान्स केला आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सने संताप व्यक्त करत शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी केली आहे.
शाळेतील वर्गात एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यासोबत भोजपूरी गाण्यावर डान्स करताना या व्हिडीओत दिसते. ‘पतली कमरीया मोरी’ या गाण्यावर शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत ठुमके लगावताना दिसते. या डान्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्सने या व्हिडीओला पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
इथे पाहा व्हिडीओ
कारण शिक्षिकेनं केलेलं वर्तन शाळेतील नियमांचं उल्लंघन करणारं आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अश्लील मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. “शिक्षक समाजाचा आरसा आहेत. ते आयटम डान्सर नाहीत. शिक्षकांप्रती आम्हाला आदर आहे. त्यामुळं शिक्षिकेनं अशा प्रकारचं कृत्य करणं चुकीचं असून विद्यार्थ्यांनाही त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युजरने दिली आहे.