शालेय जीवन हे आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. शाळा, शाळेतील मित्र-मैत्रिणी, शिक्षक, स्पर्धा, परिक्षा कवायतीचा तो तास, स्नेहसमेंलन अशा अनेक सुंदर आठवणी आजही मनाला आनंद देतात. वार्षिक स्नेहसमेंलनासाठी तयारी करताना तर विशेषत: सर्वात जास्त मजा येत असे. स्नेहसमेंलनासाठी कोणी गाणे गाते, कोणी डान्स करते तर कोणी नाटक करते. या सर्वामध्ये विद्यार्थ्यांना मदत आणि प्रोत्साहन देतात ते शिक्षक. मुलांमधील कौशल्य ओळखून त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचा शिक्षक प्रयत्न करतात. अनेकदा मुलांमधील कला गुणांना वाव देताना शिक्षकांना त्यांच्यामध्ये दडलेल्या कला गुणांचा शोध लागतो.
स्नेहसमेंलानासाठी डान्सची तयारी करुन घेताना अनेक शिक्षक स्वत: डान्स करतात. अशाच एका शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेतील शिक्षक आठवतील.
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर sir_avinash_patil86 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये शिक्षकांनी कांची रे कांची या गाण्यावर सुंदर पहाडी डान्स केला आहे. विद्यार्थी जोरजोरात ओरडून त्यांना प्रोत्साहन देत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”आमच्या शिक्षकांचा डान्स आवडला का?”
हेही वाचा –कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अॅटिट्यूड हवा!
व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने कमेंट केली. आमच्या शाळेत तर अशी शिक्षक होते की, “आम्ही त्यांना बघुनच पळायचो.”
दुसरा म्हणाला, होते होत असे शिक्षक होते कोलेकर सर.
तिसरा म्हणाला, खूप छान सर, चांगला डान्स केला.
चौथा म्हणाला, “डान्स करणारे शिक्षक नव्हते पण डान्स करायला लावणारे शिक्षक होते”
l