शाळेत असताना प्रत्येकजण आपल्या शिक्षकांची टिंगल-टवाळी करत असतो. तसंच कुठल्यातरी शिक्षकाबद्दल आपल्या मनात आदर, हळवा कोपराही असतो. याच ओढीने निरोप समारंभाच्या वेळी डोळ्यांच्या कडा ओलावतात. मध्यप्रदेशातील कटनी शाळेतील लाडक्या शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रडून हैदोस घातला. ऐवढेच नव्हे तर शिक्षकालाही डोळ्यातील आश्रू थांबवता आले नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरू -शिष्याच्या प्रेमाला नेटकरी सलाम ठोकत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या लाडक्या शिक्षकाचे नाव मंगलादीन असे आहे. नुकतीच मध्यप्रदेशमधील तीस हजार शिक्षकांची बदली झाली होती. त्यामध्ये मंगलादीन यांचाही समावेश होता. शाळेत त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रिय विद्यार्थांचा निरोप घेताना लाडक्या शिक्षकाच्या डोळ्यातही अश्रू आले होते.

मंगलादीन मास्तरांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. निरोपावेळी मंगलादीन यांना धरून विद्यार्थी धाय मोकलून रडायला लागले. कोणी त्यांना मिठ्या मारल्या, कोणी हाताला धरुन थांबवलं, तर कोणी त्यांच्याभोवती कडं घालून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचं प्रेम पाहून मंगलादीन यांनाही अश्रू अनावर झाले. एकीकडे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून गंगा-जमुना वाहत असताना, मंगलादीन यांच्या डोळ्यांना पूर आला.